America Vs China : चीनच्या 79 संस्थांना अमेरिकेकडून कुलूप | पुढारी

America Vs China : चीनच्या 79 संस्थांना अमेरिकेकडून कुलूप

न्यूयॉर्क ; वृत्तसंस्था : चिनी भाषा (America Vs China) आणि संस्कृतीचा प्रसार आणि प्रचाराच्या नावाखाली कम्युनिस्ट पक्षाचा अजेंडा राबवल्याचा आरोप करत चीनच्या 79 संस्थांना अमेरिकेने कुलूप घातले आहे. कम्युनिझमचा अजेंडा राबवण्यासाठी या संस्थांना चीन सरकारकडून फंडिंग केले जात असल्याचे अमेरिकन गृहविभागाच्या निदर्शनास आले. अमेरिकेत चीनचा प्रभाव वाढला आहे. अमेरिकत कम्युनिस्ट विचार वाढविण्यासाठी 2004 मध्ये चीन सरकारने 100 पेक्षा अधिक संस्था स्थापन केल्या. आता मात्र संस्थांची संख्या केवळ 19 आहे.

जगभरातील कम्युनिस्ट संस्थांना दरवर्षी सुमारे 100 अब्ज डॉलर्स फंडिंग चीनकडून केले जाते. या संस्था संबंधित देशातील विद्यापीठांशी भागीदारीत काम करतात. जगातील 146 देशांत सुमारे 525 संस्था असून या संस्थांतून आतापर्यंत 90 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

या संस्थांकडून चिनी भाषा शिकवले जाते आणि चीनच्या धोरणांचा प्रचार केला जात असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या संस्थांच्या माध्यमातून चीन आपले मिशन राबवत असून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे प्रसार आणि प्रचार करणे हे या संस्थाचे प्रमुख काम असल्याचे सांगण्यात आले.

संस्थेच्या परिसरात चिनी कायदा (America Vs China)

‘अमेरिकन नॅशनल असोशिएसन ऑफ स्कॉलर्स’ या संस्थेची तपासणी केली. चिनी वेबसाईटच्या माध्यमातून कम्युनिस्ट पक्षाचा अजेंडा राबवला जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच या संस्थेच्या परिसरात चीनचा कायदा लागू केल्याचे दिसून आल्याचे अमेरिकेडून सांगण्यात आले.

Back to top button