पंतप्रधानपदी इम्रान खान ११ ऑगस्टला शपथ घेणार ? | पुढारी

पंतप्रधानपदी इम्रान खान ११ ऑगस्टला शपथ घेणार ?

पेशावर (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांधिक जागा जिंकलेल्या तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमूख इम्रान खान येत्या ११ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.

पीटीआय पक्षाने ११६ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी संख्याबळ कमी आहे. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

”आपण पंतप्रधानपदी येत्या ११ ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहे,” असे खान यांनी म्हटले असल्याचे वृत्त ‘पाकिस्तान रेडिओ’ने दिले आहे. खैबर-पख्तुन्वा प्रातांचे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा येत्या ४८ तासांत केली जाईल. जो काही निर्णय घेतला जाईल; तो लोकहिताचा असेल, असे खान यांनी खैबर-पख्तुन्वा येथे पक्षाच्या सदस्यांना संबोधित करताना म्हटले आहे.  

 

Back to top button