पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इम्रान खान यांचे अभिनंदन  | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इम्रान खान यांचे अभिनंदन 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दमदार यश मिळवलेल्या इम्रान खान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून अभिनंदन केले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल ॲसेम्बलीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) ने सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून विविध मुद्यांवर चर्चा केली.पाकिस्तानमध्ये लोकशाही तळागाळापर्यंत रूजेल अशी आशा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. 

वाचा इम्रान खान ११ ऑगस्टला शपथ घेणार ?

 इम्रान खान यांना बहुमतासाठी २० जागांची आवश्यकता असून ते पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. इम्रान खान छोट्या पक्षांसह अपक्षांच्या संपर्कात आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार पीटीआयला पीएमएल-क्यू, बलुचिस्तान आवामी पार्टी यांच्यासोबत आघाडी करता येईल. पण तरीही संसदेतील संख्याबळ १२४ वर पोहोचेल. जे सध्या बहुमतासाठी कमीच ठरले. त्यामुळे इम्रान खान यांना एमक्यू-एम, जीडीए आणि अन्य अपक्षांची मदत घ्यावी लागेल. या सर्वांना एकत्र घेतल्यास १३७ ची मॅजिक फिगर गाठता येईल. पण अशा परिस्थितीत देखील इम्रान यांनी ४ जागांवर राजीनामा दिल्यामुळे अडचणी वाढू शकतील.

वाचा इम्रान खानचा ‘विजय’ ठरणार सरकार स्थापनेतील अडथळा!


 

Back to top button