इम्रान खान यांच्या शपथविधीला PM मोदींना आमंत्रण?

लाहोर (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमूख इम्रान खान येत्या ११ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.
पीटीआय पक्षाच्या वतीने शपथविधी सोहळ्याला सार्क देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा विचार सुरू आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांचाही समावेश असेल. याबाबत विचार सुरू आहे, असे पीटीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यश मिळवलेल्या इम्रान खान यांचे पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून अभिनंदन केले होते. आता मोदी यांना पाकिस्तानमध्ये आमंत्रित करण्याचा विचार सुरू आहे.
इम्रान खान यांच्या पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनीही पंतप्रधान मोदी यांना शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्याच्या वृत्ताचा इन्कार केलेला नाही. शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्याचा निर्णय विदेश मंत्रालयाबरोबर सल्लामसलत केल्यानंतर पक्षातर्फे घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.