गूगल माझ्याविरोधात; ट्रम्प यांचा खळबळजनक आरोप | पुढारी

गूगल माझ्याविरोधात; ट्रम्प यांचा खळबळजनक आरोप

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या आक्रमक आणि विक्षिप्त स्वभावाबद्दल ओळखले जातात. काल त्यांनी सर्वाधिक वापरले जाणरे सर्च इंजिन गूगलवर राग काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुगल नेहमीच त्यांच्याविरोधातील बातम्या प्रकाशित करते. जाणीवपूर्वक माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक आरोप ट्रम्प यांनी ट्विटरवरुन केला आहे.

ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले की, गूगलच्या सर्च रिझल्टमध्ये ट्रम्प संदर्भातील गोष्टींमध्ये खोट्या बातम्या आणि माहितीच समोर येते. आमच्याविरोधातील जवळपास सर्व बातम्या खोट्या आणि बदनामी करणाऱ्या असतात. यात काही माध्यमे आघाडीवर आहेत. तसेच जे निष्पक्षपणे काम करतात त्यांच्यावर दबाव टाकला जातो.  ट्रम्प न्यूज म्हणू ज्या बातम्या येतात त्यातील ९६ टक्के या डाव्या विचारसरणीच्या माध्यमांनी दिलेल्याच असतात. हे खूपच धोकादायक आहे. 

डोनाल्ड ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले की, गूगल आणि इतर काहीजण आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक चांगल्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचवत नाहीत. तसेच लोकांनी काय वाचावे आणि काय नको हेसुद्धा गूगल ठरवत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. ही खूपच वाईट परिस्थिती असून यावर काहीतरी करण्याची गरज असल्याचेही ट्रम्प म्हणाले.

Image may contain: 2 people, text

अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांच्या या ट्विटनंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांनी म्हटले आहे की, गूगल सर्च इंजिन हे माहिती शोधणाऱ्याने यापूर्वी काय शोधले आहे यानुसार सर्च करुन देत असते. त्यामुळे जे काही येते ते वाचकाच्या ब्राऊजिंग हिस्टरीवरुनच आलेले असते.

Image may contain: text

Back to top button