अमेरिकेच्या अंतर्गत बाबींत आमचा हस्तक्षेप नाही : चीन | पुढारी

अमेरिकेच्या अंतर्गत बाबींत आमचा हस्तक्षेप नाही : चीन

बिजींग (चीन) : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेत होणाऱ्या आगामी मध्यावधी निवडणुकीमध्ये चीन हस्तक्षेप करत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यावर चीनने उत्तर दिले आहे. आम्ही कोणत्याही देशांच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करत नसल्याचे चीनचे परराष्ट्रमंत्री गेंग शुआंग यांनी स्पष्ट केले आहे.  

चीन बरोबरचे द्विपक्षीय संबंध बिघडवण्याचे प्रयत्न अमेरिकेने करू नयेत, अशी सूचना त्यांनी केली आहे. चीनला मी पुन्हा जिंकू नये, अशी चीनची इच्छा आहे. यासाठी चीन अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे आढळून आले आहे, असा गौप्यस्फोट ट्रम्प यांनी केला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना केला होता. हा आरोप चीनच्या जिव्हारी लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन दरम्यान ट्रेड वॉर सुरू आहे. चिनी वस्तूंवर अमेरिकेने शुल्क लागू केल्याने चीनला मोठा फटका बसला आहे. त्यात आता ट्रम्प यांनी चीनवर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केल्याने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहेत.

Back to top button