इंडोनेशियात शक्तिशाली भूकंप; पालू शहराला धडकल्या त्सुनामीच्या लाटा | पुढारी

इंडोनेशियात शक्तिशाली भूकंप; पालू शहराला धडकल्या त्सुनामीच्या लाटा

जकार्ता (इंडोनेशिया) : पुढारी ऑनलाईन

इंडोनेशियातील सुलावेसी बेटाला आज शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ एवढी होती. या भूंकपामुळे कसल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मात्र, या भूकंपानंतर पालू शहरातील काही भागाला त्सुनामीच्या २ मीटर उंचीच्या लाटा धडकल्या आहेत. यामुळे लोक भितीने सुरक्षित ठिकाणी धावत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देशाच्या आपत्ती निवारण विभागाने दिला होता. त्यानंतर काहीवेळाने त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला.

सुलावेसी बेटावर झालेला आज झालेला भूकंप १० किलोमीटर खोल भूगर्भात झाला आहे. या भूकंपाचे केंद्र पालू शहरापासून ७८ किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी अधिक होती की सुमारे ९०० किलोमीटर दूरवर दक्षिणकडील बेटावर असलेल्या सर्वात मोठ्या  माकासर शहरा पर्यंत त्याचे धक्के जाणवले आहेत.

याआधी याभागात झालेल्या भूकंपामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता यार्षीच्या सुरुवातीला लोम्बोक बेटावर झालेल्या भूकंपापेक्षा अधिक आहे.

डिसेंबर २००४ मध्ये इंडोनेशियाच्या पश्चिम भागातील सुमात्रा बेटावर ९.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे आलेल्या त्सुनामीमुळे हिंदी महासागर क्षेत्रातील २,२०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.

Back to top button