कच्च्या तेलाने चार वर्षातील विक्रम मोडला!  | पुढारी

कच्च्या तेलाने चार वर्षातील विक्रम मोडला! 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जागतिक बाजारपेठेत क्रुड ऑईलच्या (कच्चे तेल) किंमती गगनाला भिडतच चालल्या आहेत. कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये  सातत्याने वाढ असुन आता प्रति बॅरलचा दर ८३ डॉलरवर जाऊन पोहोचला आहे. ही किंमत मागील चार वर्षांतील सर्वात जास्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आज तिसऱ्या दिवशीही वाढीची नोंद करण्यात आली. 

कच्चा खनिज तेलाने मागिल चार वर्षांचा रेकॉर्ड मोडलाअसून याला कारण पेट्रोलियम निर्यात देशांकडून (ओपेक) ओपेककडून प्रतिदिन कच्चा तेलाच्या उत्पादनात वाढ न केल्याचे आहे. तर खरे कारण अमेरिकेने इराणवर प्रतिबंध घातल्याने मंगळवारी कच्चा तेलांच्या किंमतीत वाढ तर ओपेकच्या उत्पादनात वाढ न करण्याऱ्या धोरणाचा परिणाम दर वाढीवर झाला आहे. 

अमेरिकेकडून इराणवर येत्या ४ नोव्हेंबर पासून प्रतिबंध घातला जाईल. याआधी अमेरिकेकडून इतर देशांवर आणि कंपन्यांवर इराणकडून कच्चे तेल घेऊ नये म्हणुन दबाव. याबाबतीत फ्रेंच बँक बीएनपी कमोडिटी मार्केट प्रमुख हॅरी चिलीगुरियन यांच्या मते,  असे झाल्यास इराणच्या निर्यातीवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे पुन्हा कच्चा तेलाच्या किंमती वाढतील. वाढणाऱ्या किंमती आठोक्यात आणण्यासाठी, कच्चा तेलाच्या किंमती प्रति बॅरल ८० डॉलरच्या आसपास ठेवण्यासाठी ओपेकला उत्पादनात वाढ करावी लागेल. पण काही तज्ज्ञांच्या मते ओपेक देश आपआपल्या देशांच्या विकासासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ करतील. कारण यामुळे सरळ त्यानांच फायदा होईल.

दरम्यान देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले आहेत.  दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात शनिवारी १८ पैशांनी तर चेन्नई मध्ये १९ पैशांनी वाढ झाली. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये शनिवारी डिझेलचा अनुक्रमे ७४.६३ रुपये, ७६.४८ रुपये, ७९.२३ रुपये आणि ७८.९१ रुपये होता. 

Back to top button