सुषमा स्वराज यांनी आसू़ड ओढल्यानंतर पाकिस्तानचा ‘थयथयाट’ | पुढारी

सुषमा स्वराज यांनी आसू़ड ओढल्यानंतर पाकिस्तानचा 'थयथयाट'

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही अशा भाषेत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाकिस्तानच्या दुटप्पीपणावर जोरदार टिका करत त्यांचा बुरखा फाडला. 

पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालून भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा पयत्न आहे अशा अनेक आरोपांचा स्वराज यांनी पाढा वाचला. त्यांच्या भाषणानंतर पाकिस्तानी माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सुषमा स्वराज यांचे निराधार आरोप असल्याचे म्हटले आहे. काहीनी हा त्यांचा अजेंडा असल्याचे, तर काहीनी पाकच्या विरोधातील मुद्द्यांवर भर दिला. 

जाणून घेऊया काय म्हणाले पाकिस्तानी माध्यमे 

जिओ न्यूज

जिओ न्यूज ने म्हटले की, सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर केलेले आरोप निराधार आहेत. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून तेथील जनतेवर होणारा अन्याय आणि मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन याकडे दर्लक्ष करीत आहेत. 

डॉन 

सुषमा स्वराज यांनी घणाघाती आरोपांचे खंडन पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केले होते. कुरेशी यांनी सभेत केलेल्या भाषणाची दखल घेत पाकिस्तानचा प्रत्यक्ष ताबा रेषेवरील आगळीकीबद्दल भारताला इशारा अशा डॉनने पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली आहे. पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघामधील माजी राजदुत मुनीर अक्रम यांनी  एका स्वतंत्र लेखामध्ये मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना आगामी लोकसभा निवडणुकीचा त्यांचा पराभव होईल अशी टीका केली आहे. 

एक्स्प्रेस ट्रिब्युन 

भारताकडून पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्याचा अजेंडा राबवत असल्याची टीका केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानविरोधी अलंकारिक भाषा वापरून निवडणुका जिंकण्याचा अजेंडा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तान टुडे 

पाकिस्तान  टुडे डॉन वृत्तपत्रा सारखीच भूमिका घेतली आहे. 

द नेशन

शांततेवरून राजकारण करणाऱ्या भारताला पाकिस्तानचा प्रहार अशी दखल घेतली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या भाषणाचा संदर्भ घेतला आहे. 

Back to top button