भारत- जपानमध्ये हायस्पीड रेल्वेसह सहा करार | पुढारी

भारत- जपानमध्ये हायस्पीड रेल्वेसह सहा करार

टोकियो (जपान) : पुढारी ऑनलाईन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चे दरम्यान आज सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यात हायस्पीड रेल्वे, नौदल सहकार्य आदींचा समावेश आहे. तसेच दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांच्यात २+२ चर्चेसाठीही सहमती झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय, प्रादेशिक, जागतिक समस्यांवर चर्चा झाली.

१३ व्या वार्षिक परिषदेत दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढविणे, विशेषतः इंडो- पॅसिफीक प्रदेशात शांतता निर्माण करणे आदी मुद्यांचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटले की, दोन्ही देशांदरम्यान डिजीटल भागिदारी ते सायबर स्पेस, आरोग्य, संरक्षण, समुद्र ते अंतराळ आदी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर सहमती झाली आहे.

यावेळी मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी कर्ज घेण्यासही दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी झाली आहे.

 

Back to top button