‘युएई’चे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन - पुढारी

‘युएई’चे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन

शारजा ः संयुक्‍त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नह्यान यांचे शुक्रवारी निधन झाले. देशात 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकलेल्या अवस्थेत राहील. तीन दिवस सर्व मंत्रालये आणि कार्यालये बंद राहतील.

यात खासगी क्षेत्रातील कार्यालयांचाही समावेश आहे. 3 नोव्हेंबर 2004 पासून शेख खलिफा अबुधाबीचे शासक होते. त्यांचे वडील शेख झाएद बिन सुल्तान अल नह्यान यांनी 1971 ते 2004 पर्यंत राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. 1948 मधील जन्म असलेले शेख खलिफा अबुधाबीचे 16 वे आमीर अर्थात शासक होते. त्यांनी अबुधाबी आणि यूएईच्या पायाभूत सुविधांत मोठ्या सुधारणा केल्या.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button