‘त्या’ सीरियल किलरने केले तब्बल ९० खून | पुढारी

'त्या' सीरियल किलरने केले तब्बल ९० खून

न्यू यॉर्क : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील टेक्सास येथील तुरुंगात एका ७८ वर्षाच्या कैद्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. सॅम्युअल लीटल असे त्या गुन्हेगाराचे नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पाहिल्यावर अंगावर भितीचे शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याने गेल्या ५० वर्षात ९० खून केले आहेत. त्याला अमेरिकेतील गुन्हेगारी जगतातील सर्वात धोकादायक सीरियल किलर म्हणून ओळखले जाते.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, या सीरियल किलरला रोज तुरुंगातील एका खोलीत कडक सुरक्षा व्यवस्थेत व्हीलचेअरवरून चौकशीसाठी नेले जाते. तो तपास अधिकाऱ्यांसमोर रोज एका खुनाचा पाढा वाचतो. सध्या तो मधुमेह, हृदयरोगाने त्रस्त आहे. त्याचे शरीर थकले आहे. मात्र, त्याची गुन्हेगारी कारनामे कौर्याची परिसीमा गाठणारे आहेत.

त्याने केलेल्या ९० खुनांपैकी ३० प्रकरणांत तपास अधिकाऱ्यांना पुरावे मिळाले आहेत. उर्वरित खून प्रकरणांत पुरावे सापडलेले नाहीत. गरीब आणि अमलीपदार्थाचे व्यसन असणाऱ्या महिलांना लिटलने मारले आहे. यामुळे हत्या झालेल्या महिलांच्या कुटुंबियांकडून तक्रारी येत नव्हत्या. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

गुन्हेगार बनण्यापूर्वी लिटल बॉक्सर होता. त्यामुळे हाताच्या पंचने मारून त्याने महिलांच्या हत्या केल्या आहेत. १९८० च्या दशकात लॉस एंजलिसमधील ३ महिलांच्या हत्येप्रकरणी लिटलने याआधी शिक्षा भोगली आहे. आता नुकतीच त्याला १९९४ मध्ये एका हत्येप्रकरणी टेक्सास येथील न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

तपास अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिटलने २५ ते ५० वर्षापूर्वी १४ राज्यांतील ९० महिलांच्या हत्या केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ३० खुनाची कबुली दिली आहे. या सीरियल किलरला २०१२ मध्ये लॉस एंजलिस येथील २ महिलांच्या हत्येप्रकरणी डीएनए पुराव्याच्या आधारे जेरबंद करण्यात आले.

Back to top button