मागील गोष्टींसाठी मला जबाबदार ठरवू नये : इम्रान खान  | पुढारी

मागील गोष्टींसाठी मला जबाबदार ठरवू नये : इम्रान खान 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताबरोबर शांततेवर बोलण्याची तयारी दाखवली असून भारताने यासाठी तयारी दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनेने, डी गँगचा म्होरक्या दाऊद इब्राहिम व मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद बद्दल विचारले असता, मागील गोष्टींसाठी मला जबाबदार ठरवू नये असे पंतप्रधान इम्रान खान  यांनी सांगितले. 

या दिलेल्या आपल्या स्टेटमेंटवर, त्यांनी, मी जे सांगत आहे त्यावर मी ठाम असून, जे काही भारतात झाले आहे त्यासाठी जुन्या गोष्टींसाठी मी जबाबदार नाही. मलाही आमच्या संसदेत उत्तरांचे उत्तरे द्यावी लागतात. त्यांनी काश्मीरचा प्रश्न हा शांततेने सोडवता येईल. दहशतवादासाठी आमच्या जमिनीचा वापर करणे हे देशाच्या हिताचे नाही. तसेच कोणतीही गोष्ट एकाबाजूने कधीच होत नाही. असे ते म्हणाले. यावेळी त्यांना हाफिज सईद बद्दल विचारले असता, २६/११ हा विषय न्यायप्रविष्ट आहे. तर दाऊद इब्राहिम हा १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी आहे. या बॉम्बस्फोटात २५७ जण ठार झाले आणि ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. 

यावेळी काश्मीर प्रश्नावर इम्रान खान यांना विचारले असता, ते म्हणाले, की जर दोन्ही बाजूच्या नेतृत्वाने ठरवले. काश्मीरची समस्या सहजपणे सोडवता येईल. न्यूयॉर्कमधील यूएनजीए बैठकीच्या वेळी जी चर्चा रद्द करण्यात आली ते योग्य नव्हते. चर्चा रद्द करणे म्हणजे भारताला बोलण्याची इच्छा नाही असे प्रतीत होते. यूएनजीए बैठकीत सुषमा स्वराज पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यात चर्चा होणार होती. पण पाकिस्तानकडून वेळोवेळी काश्मीर आणि सिमेवर होणारे सिसफायरिंगचे उलंघन यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही. 

यावेळी इम्रान यांनी, आपल्याला पुढे जाण्यासाठी जुन्या गोष्टी विसरून जायला हवे असे वारंवार सांगितले. दहशतवादाच्या प्रश्नावर इम्रान त्यांना विचारले असता, पाकिस्तानमधून होणारा दहशतवाद हा केवळ भारतासाठीच नाही तर इतर कोणत्याही देशाविरुद्ध होणे हे ठिक नाही. असे ते म्हाणाले. नुकताच काही दिवसापुर्वी इम्रान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “शांततेच्या चर्चेसाठी  माझ्या प्रस्तावावर भारताने नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यावर मी निराश आहे. असो, मी मोठ्या पदावर गेलेलो अशा छोट्या लोकांना पाहवत नाही, ज्यांना दूरदृष्टी नाही, उद्याचे चांगले चित्रपहाण्याची कुवत नाही. त्यांचे हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. 

या लावण्यात आलेल्या अंदाज बाबतीत, हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही, ते भारतातील काही निवडक नेत्यापैकी एक नेते आहेत जे बोलू शकतात. भारत-पाकिस्तानमधील कोणत्याही चर्चा करणे हे फक्त पाकिस्तानची जबाबदारी नाही. यासाठी भारतानेही तयारी दाखवायला हवी. 

करतारपुर कॉरिडॉरच्या भुमीपुजनाच्या एक दिवस आधी भारत संबंध वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. या काळात पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यावर शांत राहिले आणि धार्मिक कार्यक्रमात कश्मीरचा मुद्दा उठवला यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 

Back to top button