तब्बल ३५ दिवसानंतर अमेरिकेतील शटडाऊन संपविण्याची घोषणा | पुढारी

तब्बल ३५ दिवसानंतर अमेरिकेतील शटडाऊन संपविण्याची घोषणा

वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेच्या इतिहासात सर्वांत दीर्घकाळ चाललेले ३५ दिवसांचे शटडाऊन तूर्त संपल्यात जमा आहे. मेक्सिको सीमेवरती भिंत बांधण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या आर्थिक खर्चाच्या विधेयकाला काँग्रेस खासदारांनी विरोध केल्यानंतर नाताळापूर्वीच २२ डिसेंबर रोजी अमेरिका सरकारचे शटडाऊन झाले होते. मात्र, अखेर ट्रम्प यांनी विरोधक डेमोक्रॅटस यांच्या बरोबर एक समझोता करण्याची घोषणा केली.

शटडाऊन झाल्यामुळे शासकीय आर्थिक कामकाज अशतः ठप्प झाले होते. याचा फटका ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना बसला आहे. आता शटडाऊन संपवून तोडगा काढण्यावर सहमती झाली आहे. तूर्त १५ फेब्रवारीपर्यंत कामकाज सुरू करण्यासाठीच्या समझोत्यावर ट्रम्प स्वाक्षरी करतील, असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. 

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी बिनपगारी काम करत आहेत. दरम्यान, जर योग्य अटीवर समझोता झाला नाही तर पुन्हा शटडाऊन होईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. 

 

Back to top button