खलिस्तानवाद्यांची अमेरिकेतील भारतीयांकडून बोलती बंद (Video) | पुढारी

खलिस्तानवाद्यांची अमेरिकेतील भारतीयांकडून बोलती बंद (Video)

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

भारताने काल २६ जानेवारीला आपला ७० प्रजासत्ताक दिन साजरा केला. जरी हा भारताचा प्रजासत्ताक दिन असला तरी तो जगभरात विखुरलेले भारतीय जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा करत असतात. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्येही भारतीय दुतावासात अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. पण, यावेळी काही खलिस्तानवाद्यांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न अमेरिकेतील भारतीयांनी हाणून पाडला. 

भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दुतावासात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी शिख फॉर जस्टिस या जहालवादी संघटनेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. ते खलिस्थानचे झेंडे हातात घेवून घोषणाबाजी करत होते. पण, हा प्रयत्न अमेरिकेतील भारतीयांनी ‘भारत माता की जय’ घोषणा देत हाणून पाडला. अमेरिकेतील देशप्रेमी भारतीयांचा आवाज इतका बुलंद होता की किरकोळ संख्येत असलेल्या फुटीरतावाद्यांचा आवाजच बंद झाला. 

दरम्यान, शिख फॉर जस्टिस या जहालवादी संघटनेच्या वेबसाईटवर दूतावासाबाहेर भारताचा झेंडा जाळल्याचा दावा केला होता. पण, हा दावा या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यावर फोल ठरला. हा दावा खलिस्तानवाद्यांचा आंदोलन फ्लॉप ठरल्यानंतर सारवसारव करण्याचा एक प्रयत्न असल्याचे काही सूत्रांनी सांगितले. 

Back to top button