...तर परिस्थिती माझ्या किंवा मोदींच्या हातात राहणार नाही, चर्चेसाठी तयार :  इम्रान खान  | पुढारी

...तर परिस्थिती माझ्या किंवा मोदींच्या हातात राहणार नाही, चर्चेसाठी तयार :  इम्रान खान 

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

पुलवामामध्ये झालेल्या क्रुर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (ता. २६) पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे जाळे नेस्तनाबूत केले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने युद्ध बाजूला ठेवून चर्चेची तयारी असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज चर्चेची तयारी असल्याचे सांगताना युद्ध हा पर्याय नसल्याचे नसल्याचे म्हणाले.

इम्रान खान म्हणाले, जर दोन्ही देशांदरम्यान युद्ध झालेच, तर परिस्थिती माझ्या किंवा नरेंद्र मोदींच्या ताब्यात राहणार नाही. जर तुम्हाला दहशतवादावर कोणत्याही प्रकारची बोलणी हवी असल्यास आम्ही तयार आहोत. आपण चर्चेला बसून चर्चा केली पाहिजे. जगामध्ये झालेल्या युद्धांचा अभ्यास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. ज्यांनी युद्धाला प्रारंभ केला, त्यांनाच ते कुठं जाऊन संपेल याची माहिती नाही. त्यामुळे मी भारताला विचारु इच्छितो, की दोन्ही देशांकडे शस्त्रे आहेत. त्यामुळे गैरसमज आपल्याला परवडण्यासारखे नाहीत.

Back to top button