नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पर्यटन मंत्र्यांसह ५ जणांचा मृत्यू | पुढारी

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पर्यटन मंत्र्यांसह ५ जणांचा मृत्यू

काठमांडू (नेपाळ) : पुढारी ऑनलाईन

नेपाळमधील तपेलजंग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नेपाळचे पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री रविंद्र अधिकारी यांच्यासह अन्य पाचजणांचा मृत्यू झाला आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमधून पर्यटनमंत्री रविंद्र अधिकारी यांच्यासह येती एअरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक आंग तेरसिंग शेरपा, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे साहाय्यक अधिकारी युवराज दाहाल हे देखील प्रवास करत होते. मंत्री, अधिकाऱ्यांचा समावेश असलेले हे पथक एका स्थानिक हवाई विमानतळाच्या पाहणीसाठी गेले होते. या दरम्यान, ही दुर्घटना घडली आहे. 

नेपाळमधील पहाडी भागात बर्फवृष्टी दरम्यान ही घटना घडली. या हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काहीवेळात ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते पथिबारा भागात कोसळले असल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. घटनास्थळी पोलिस पथकाला पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक सरबेंद्र खनाल यांनी दिली. 

 

Back to top button