भारत आणि पाकिस्तान तणावावर लवकरच तोडगा : डोनाल्ड ट्रम्प  | पुढारी

भारत आणि पाकिस्तान तणावावर लवकरच तोडगा : डोनाल्ड ट्रम्प 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली. आपण त्याबाबत आशावादी असल्याचे त्यांनी नमूद केले. 

ट्रम्प यांनी सांगितले, की आमच्याकडे दोन्ही उभय देशांसाठी आकर्षक न्यूज आहे. उभय देश त्यासाठी विचार करत असून आम्ही त्यांना थोपविण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्याकडे आकर्षक न्यूज आहे. त्यामुळे मला असे वाटते की तणाव कमी होईल. व्हिएतनाममधील हनोईमध्ये ट्रम्प बोलत होते. त्यांची उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी झालेल्या द्वितीय समेट नंतर ते बोलत होते. 

दशकांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या ठिकाणी दुर्दैवाने न आवडणारे अनेक मुद्दे आहेत. त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही मध्यस्थी आहोत, असेही ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री माईक पॅम्पेओ यांनी दोन्ही उभय देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून लष्करी कावाई टाळण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर त्यांनी उभय देशांना चर्चेने तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. 

Back to top button