नॉर्वेच्या समुद्रातील बेलुगा व्हेल रशियाचा हेर? | पुढारी

नॉर्वेच्या समुद्रातील बेलुगा व्हेल रशियाचा हेर?

ओस्लो (नॉर्वे) : पुढारी ऑनलाईन

नॉर्वेच्या समुद्रातीत बेलुगा व्हेल मासा आढळला आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे या माशाच्या गळ्यात कॅमेरा आहे. हा कॅमेरा गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा असावा अशी शक्यता नॉर्वेतील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मच्छिमार समुद्रात मासेमारी करत असताना त्‍यांना एक पांढऱ्या रंगाचा मासा आढळून आला.  या माशाच्या गळ्यात काहीतरी गुंडाळल्‍याचे या मच्छिमारांना दिसले. त्‍यामुळे त्‍यांनी याबाबतची माहिती तात्‍काळ अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यानी या प्रकाराची चौकशी केली असता त्‍यांना या बेलुगा व्हेलच्या गळ्याला बांधण्यात आलेल्या पट्ट्यावर इक्युपेमंट ऑफ सेंट पीट्सबर्ग असे लिहिलेले आढळून आले. यावरून हा व्हेल रशियाचा हेर असावा असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

आर्कटिक विद्यापीठात मरीन बायॉलॉजीचे प्रोफेसर आडन रिकॉर्ड्सन यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रशियाकडे अशा प्रकारचे अनेक घरगुती व्हेल आहेत. या व्हेलपैकीच काही समुद्रात सोडले असण्याची शक्यता आहे. व्हेलच्या गळ्यातील हा कॅमेरा  रशियाच्या नौसेनेचा असण्याची शक्यताही काही माध्यमांनी प्रसारित केले आहे. 

रिकॉर्ड्सन यांच्यामते, बेलुगा व्हेलमाशाला बोली भाषेत पांढरा व्हेल म्हणतात. हा व्हेल प्रजातीतील सर्वात छोटा व्हेल आहे. बेलुगा व्हेलचा आकार २० फुटांपर्यंत असतो. 

Back to top button