ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणतात, ‘कितने अच्छे है मोदी’ | पुढारी

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणतात, 'कितने अच्छे है मोदी'

ओसाका : पुढारी ऑनलाईन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामकाजाची आणि कौशल्याची मोहर केवळ भारतातच उमटवली नसून परदेशातही उमटवली आहे. याचा प्रत्यय जपान येथे झालेल्या जी २० शिखर परिषदेदरम्यान आला. या परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ‘कितने अच्छे है मोदी’ असे हिंदीमध्ये ट्विट केले आहे.

जपानमधील ओसाका येथे जी २० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांची भेट घेतली. याच भेटीचा फोटो पंतप्रधान मॉरिसन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ‘कितने अच्छे है मोदी’ अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोला #G20OsakaSummit असा टॅगदेखील दिला आहे. 

त्यांच्या या हिंदीमधील ट्विटची ऑस्ट्रेलियामध्ये रहात असलेल्या भारतीयांमध्ये मोठी चर्चा होत आहे. त्यांचे हे ट्वीट आतापर्यंत ११ हजार लोकांनी रिट्विट केले आहे. 

जी २० परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जापानचे पंतप्रधान शिंजो आबे, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय बैठकीत चर्चा केली. या बैठकीत त्यांनी व्यापार, विकास आणि दहशतवाद या विषयावर चर्चा केली. 

Back to top button