ब्रिटन संसदेचे सप्टेंबरमध्ये निलंबन, महाराणी एलिजाबेथ यांची मान्यता | पुढारी

ब्रिटन संसदेचे सप्टेंबरमध्ये निलंबन, महाराणी एलिजाबेथ यांची मान्यता

लंडन : पुढारी ऑनलाईन

बिटनच्या महाराणी एलिजाबेथ यांनी संसद निलंबीत करण्याच्या सरकारच्या शिफारशीला हिरवा कंदील दाखवला आहे. महाराणी एलिजाबेथ यांच्या मान्यतेनंतर ब्रिटन संसदेचे सप्टेंबरमध्ये निलंबन केले जाणार आहे. संसदेचे हे निलंबन १४ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. 

ब्रेक्झिटच्या मुदतीच्या काही दिवस आधी व सप्टेंबरमध्ये खासदार परतल्यानंतर संसद बरखास्त करण्याची शिफारस सरकारने केली होती. त्याला महाराणी एलिजाबेथ यांनी मान्यता दिली आहे. 

बोरिस जॉनसन म्हणाले की, १४ ऑक्टोबरला महाराणी एलिजाबेथ यांचे भाषण होणार आहे. ज्यामध्ये त्या एक अतिशय रोमांचक अजेंड्याची रूपरेषा जाहीर करतील. बिटनला नवीन कायद्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही नवीन आणि महत्वाची विधेयके मांडणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर महाराणी एलिजबेथ यांचे भाषण होणार आहे.

टोरी बँकबेन्चर डोमिनिक ग्रिव्ह यांनी सरकारच्या या निर्णयाचे ‘अपमानकारक’ असे वर्णन केले. या निर्णयामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचे सरकार पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 

माजी पंतप्रधान जॉन मेजर यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी जॉन्सन सरकारच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयाचे दार ठोठावण्याची धमकी दिली आहे. तर, एसएनपीच्या न्यायिक प्रवक्त्या जोआना चेरी यांनी या खटल्याला आव्हान देण्यासाठी स्कॉटिश न्यायालयात काम सुरू केले आहे.

Back to top button