चीन, इटलीनंतर कोरानाचे 'या' देशात थैमान, एका दिवसात ४१८ जणांचा बळी  | पुढारी

चीन, इटलीनंतर कोरानाचे 'या' देशात थैमान, एका दिवसात ४१८ जणांचा बळी 

पॅरिस : पुढारी ऑनलाईन 

जगात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. चीन आणि इटलीनंतर फ्रान्समध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे फ्रान्समध्ये एका दिवसात (दि. ३०) ४१८ लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने एका दिवसात मृत्यू झालेल्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे. फ्रान्समध्ये मृत्यूची संख्या ३,०२४ वर पोहोचली आहे. फ्रान्स सरकारकडून रोज प्रकाशित होणाऱ्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं आहे की, फ्रान्समध्ये कोरोनाचे २० हजार ९४६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. यातील ५ हजार ५६, जणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आले आहे. 

युरोप ते अमेरिकेपर्यंत भयावह स्थिती बनली आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत जवळपास ३८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ८ लाख लोक संक्रमित आहेत.  

कोरोनाने इटलीमध्ये ११ हजार ५९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख १,७४९ लोक कोरोनाने बाधित आहेत. येथे पहिल्या रुग्णाचा मृत्यू फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाला होता. तर १३,०३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

स्पेनमध्ये मागील चोवीस तासात ८१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८५ हजार १९५ प्रकरणे समोर आली आहेत.  रविवारी (दि. २९) फ्रान्समध्ये कोरोनाने २९२ जणांचा मृत्यू झाला होता. 

 

Back to top button