माझ्या पराभवासाठी चीन काहीही करू शकतो; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा | पुढारी

माझ्या पराभवासाठी चीन काहीही करू शकतो; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूचा आकडा एकट्या अमेरिकेत पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विषाणूपुढे अमेरिका चांगलीच हतबल झाल्याचे दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान, आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा पराभव व्हावा, मी पुन्हा निवडून येऊ नये म्हणून चीन काहीही करू शकतो, असा खळबळजनक दावा ट्रम्प यांनी केला आहे. 

अमेरिकेतील रुग्णांचे प्रमाण जगाच्या एक तृतीयांश असून जगात ३१ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओव्हलमधील कार्यालयात झालेल्या मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले, राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत माझा पराभव व्हावा म्हणून चीन काहीही करू शकतो. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि माझे प्रतिस्पर्धी जो बिडेन विजयी व्हावे अशी बीजिंगची इच्छा आहे. कारण व्यापार आणि आयात-निर्यातीसंदर्भात मी टाकलेला दबाव कमी करण्यासाठी चीन हे करत आहे, असा दावा ट्रम्प यांनी यावेळी केला.

तसेच, चीनने करोना विषाणूबद्दल जगाला लवकरात लवकर माहिती देण्याची तत्परता दाखवायला हवी होती. आम्ही नेमके काय घडले याचा विचार सध्या करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. 

Back to top button