उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आता निर्णय घेत नाहीत | पुढारी

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आता निर्णय घेत नाहीत

प्‍योंगयांग : पुढारी ऑनलाईन

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या तब्येती विषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आता अशी बातमी येत आहे की त्यांनी निर्णय घेणे बंद केले आहे. जपानमधील एका वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, उत्तर कोरियाच्या सत्ताधारी पक्षाने काही प्रस्ताव स्वाक्षरीसाठी किम यांच्याकडे पाठविले आहेत पण त्यासंबंधित कागदपत्रे परत देण्यात आलेली नाहीत.

वाचा : माझ्या पराभवासाठी चीन काहीही करू शकतो; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

एप्रिलच्या मध्यापासून अनेक सरकारी कार्यालयांना किम यांची सही केलेली कागदपत्रे मिळालेली नाहीत. किम मरण पावले आहेत. किंवा ते खूप आजारी आहे अशा बातम्या येत आहेत. किम जोंग कुठे आहेत ते माहित असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाने केला आहे.

 किम जोंग यांनी किम इल सुंग यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाध्येही सहभाग घेतला नाही. तेव्हापासून किम जोंग यांच्या विषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. किम यांची बहीण किम यो-जोंग यांनी सत्ता सांभाळली आहे. सत्ताधारी पार्टी आणि अन्य संस्था काही दिवसांपासून किम यांनी प्रस्तावांवर सह्या केल्या आहेत की नाहीत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

किम जोंग यांच्यावर उपचार करण्यासाठी फेब्रुवारी मध्ये जर्मनीच्या डॉक्टरांनी उत्तर कोरियाचा दौरा केला आहे. असा दावा एका रिपोर्टमध्ये केला आहे. या अगोदर फ्रान्समधून डॉक्टरांची टीम पाठवण्याची विनंती केली होता. दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्ली रिसर्च सर्व्हिसेसचे म्हणणे आहे की, किम यांची बहिण काही दिवसांपासून त्यांच्या अधिकाराचा वापर करत आहे. किम यो-जोंग यांना वास्तविक वारस मानले जात नसल्यामुळे त्यांना पदभार स्वीकारण्याची संधी नाही. असे तेथील एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

उत्तर कोरियाची स्थापना दुसऱ्या महायुध्दानंतर झाली. आणि तेव्हापासून किम परिवारातील पुरुषांनीच या देशावर राज्य केले आहे. त्यामुळे किम यो- जोंग यांच्या नियुक्तीला तेथील नागरिक अपमान मानतील असा दावा केला आहे. उत्तर कोरियाकडून आलेल्या माहितीची पडताळणी करणे अवघड आहे, कारण माहिती देवाणघेवाणीवर देशाचे कठोर नियंत्रण आहे.

वाचा : व्हिएतनाम विरोधातील २० वर्षांच्या युद्धातील मृतांपेक्षा अधिक लोक अमेरिकेत कोरोनाने मृत्यूमुखी!

Back to top button