ट्रम्प यांच्याकडून एचसीक्यूचे सेवन | पुढारी | पुढारी

ट्रम्प यांच्याकडून एचसीक्यूचे सेवन | पुढारी

वॉशिंग्टन : पीटीआय 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले दोन आठवडे रोज हायड्रोक्सीक्लोरोक्विनची  (एचसीक्यू) गोळी घेतली आहे. या औषधामुळे ते पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त झाले असल्याचे व्हाइट हाउसच्या प्रसिध्दी सचिव  कायली मॅकनेनी यांनी शुक्रवारी सांगितले. 

 हे औषध घेतल्यापासून आपल्याला अगदी  फिट वाटत आहे. आवश्यकता वाटल्यास ते आणखी काही दिवस या गोळ्या घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ट्रम्प यांच्याबरोबरच  अनेक डॉक्टर आणि संशोधकांनीही हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे समर्थन केले आहे. त्यांनी रुग्णांना हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे. एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी या औषधांची भारताकडे मागणी केली होती.  यानंतर भारताने नियम बदलून हायड्रोक्सीक्लोरोक्विन इतर देशांना निर्यात केले होते.

Back to top button