करतारपुर साहिब कॉरिडॉर खुला होणार, पाकच्या मंत्र्यांची माहिती | पुढारी

करतारपुर साहिब कॉरिडॉर खुला होणार, पाकच्या मंत्र्यांची माहिती

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तान पुन्हा शीख बांधवांसाठी करतारपूर साहिब कॉरिडॉर खुले करण्याच्या तयारीत आहे. याबद्दलची माहिती परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ट्विट करून दिली आहे. 

कोरोना महामारीमुळे जगातील सर्व धार्मिक तीर्थस्थळे बंद करण्यात आली होती. 

कुरैशी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, पाकिस्तान सर्व शीख तीर्थयात्रेकरूंसाठी करतारपूर साहिब गलियारे कॉरिडॉर पुन्हा खुले करण्याची तयारी करत आहे. महाराजा रणजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ जून, २०२० रोजी कॉरिडॉर खुला केला जाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगीतले.  

 

Back to top button