चीन्यांना जवळ करून भारताची कुरापत काढणाऱ्या नेपाळ सरकारमध्ये उलट गणती सुरु! | पुढारी

चीन्यांना जवळ करून भारताची कुरापत काढणाऱ्या नेपाळ सरकारमध्ये उलट गणती सुरु!

काठमांडू : पुढारी ऑनलाईन 

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासाठी धोक्याची घंटा सुरु झाली आहे. सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षामधील कुरघोडी आणि देशातील सरकारविरोधात सुरू असलेल्या रोषाकडे दुर्लक्ष होण्यासाठी पंतप्रधान ओली आता अतिरेकी राष्ट्रवादाचा उपयोग करत आहेत. आपल्या पक्षात झालेल्या भांडणांबद्दल त्यांनी भारतावर अप्रत्यक्ष आरोप करत सांगितले की एक दूतावास हॉटेलमध्ये माझ्या सरकारविरूद्ध कट रचत आहे.

अधिक वाचा : भारताच्या आणखी एक शेजारी देशाला लालूच दाखवण्याचा चीन्यांकडून डाव सुरु!

मदन भंडारी यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान के.पी. शर्मा ओली म्हणाले की, आपल्याला पदावरून हटवण्याचा खेळ सुरू झाला असला तरी ते अशक्य आहे. पंतप्रधान ओली यांनी असा दावा केला होता की काठमांडूतील एका हॉटेलमध्ये त्यांना हटवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत आणि त्यात एक दूतावासही कार्यरत आहे. हा इशारा भारताकडे आहे यात वाद नाही. 

अधिक वाचा : ‘हिंदी’वर बंदी घालण्याची नेपाळची नवी खेळी

घटना दुरुस्तीने नेपाळच्या नकाशामध्ये भारतीय भूभाग दाखवल्यापासून आपल्याविरुद्ध कट रचले जात आहेत, असा दावाही त्यांनी केला. मला पदावरून काढून टाकण्याची खुली शर्यत सुरु झाली आहे, नेपाळचे राष्ट्रीयत्व कमकुवत नाही. नकाशा छापण्यासाठी पंतप्रधानांना पदावरून काढून टाकले जाईल, असे कुणालाही वाटले नाही.

अधिक वाचा : चीनविरोधात अमेरिकन फौजा भारताच्या मदतीला

पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा पक्ष आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान ओली यांच्यावरील टीकेनंतर राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास ते पक्ष तोडतील असा इशारा प्रचंड यांनी ओली यांना दिला आहे.

पंतप्रधान ओली स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असेही प्रचंड यांनी म्हटले आहे. पंतप्रधान खुर्चीसाठी नेपाळी सैन्यदलाचा अवलंब करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की आपण ऐकले आहे की पंतप्रधान ओली सत्तेत राहण्यासाठी पाकिस्तानी, अफगाणी किंवा बांगलादेशी मॉडेलचा अवलंब करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु असे प्रयत्न नेपाळमध्ये यशस्वी होणार नाहीत.

अधिक वाचा : ‘राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षेबाबत कधी चर्चा होईल?’

भ्रष्टाचाराच्या नावाखाली आम्हाला कुणीही तुरूंगात पाठवू शकत नाही असा इशारा प्रचंड यांनी ओली यांना दिला. सैन्याच्या मदतीने देशात राज्य करणे सोपे नाही. ओलींवर निशाणा साधताना प्रचंड म्हणाले की, विरोधकांशी आघाडी करून किंवा पक्षात फूट पाडून सरकार चालवणे शक्य नाही.

कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुतेक सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर ओली यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले आहेत. प्रचंड यांनी सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला, तर ओली म्हणाले की प्रचंड यांनी पक्षाची नासाडी केली आहे.

अधिक वाचा : चीनच्या अतिक्रमणावर नेपाळने केला खुलासा

Back to top button