अमेरिकेतील भारतीयांना आर्थिक अस्थैर्याची भीती | पुढारी

अमेरिकेतील भारतीयांना आर्थिक अस्थैर्याची भीती

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 

कोरोना महामारीने जगभरातील अर्थव्यवस्थांवर केलेल्या परिणामांमुळे अमेरिकेतील दर 5 पैकी 2 भारतीयांना दीर्घकालीन आर्थिक अस्थैर्याची काळजी वाटत असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. 

अमेरिकेतील भारतीय समाजावर झालेल्या परिणामांचा अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. जवळजवळ सर्वांनीच आपल्या जीवनशैलीत बदल केल्याचेही सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. फाऊंडेशन ऑफ इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज (एफआयआयडीएस) ने आपल्या अहवालातून ही माहिती दिली आहे. 

‘एआयआयडीएस’चे संचालक खंडेराव कांड म्हणाले की, सर्व्हेतील माहितीनुसार कोरोना महामारीचा 30 टक्के इंडो-अमेरिकन्सच्या रोजगारावर आणि इंटर्नशिपवर परिणाम झाला आहे.

Back to top button