संयुक्त अरब अमिराती आणि इस्त्राईलमध्ये जे ४८ वर्षात घडलं नाही 'ते' उद्या होणार! | पुढारी

संयुक्त अरब अमिराती आणि इस्त्राईलमध्ये जे ४८ वर्षात घडलं नाही 'ते' उद्या होणार!

अबु धाबी/ तेल अवीव : पुढारी  ऑनलाईन

संयुक्त अरब अमिरातीने (युएई) ४८ वर्षानंतर इस्त्राईलवरील बहिष्कार मागे घेतला आहे. उद्या (ता.३०) अमेरिका-इस्‍त्रायलच्या अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ अबुधाबीला पोहोचत आहे. यामध्ये महत्‍वाचे द्विपक्षीय करार होण्याची शक्‍यता आहे. इस्‍त्राईल आणि यूएईमधील नवे नाते आणखी घट्ट होत आहे. यूएईने काल (ता.२९)  ४८ वर्षे जुना कायदा पूर्णपणे रद्द केला. पहिल्‍या कायद्यानुसार इस्‍त्राईलवर बहिष्‍कार टाकण्यात आला होता. यासाठी यूएईचे प्रमुख शासक खलीफा बिन जाएद अल नाह्या यांनी तसा आदेश जारी केला आहे. 

उद्या (ता.३१) इस्‍त्राईल आणि अमेरिकेच्या उच्चपदस्‍थ अधिकाऱ्यांचे पथक अबुधाबीमध्ये पोहोचणार आहे. यांच्यामध्ये अनेक स्‍तरावर बैठका होणार आहेत. यामध्ये असेही मानण्यात येत आहे की, इस्‍त्राईल आणि यूएईमध्ये महत्‍वपूर्ण व्यापारी करार होऊ शकतात. 

इस्‍त्राईल आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी १० वाजता तेल अवीवहून अबुधाबीसाठी निघणार आहे. या शिष्‍टमंडळामध्ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचे विशेष सल्‍लागार जारेद कुशनर हे देखील असणार आहे. यांच्यासोबतच इस्‍त्राईल आणि अमेरिकेचे आर्थिक आणि सैन्याशी निगडीत उच्चपदस्‍थ अधिकारीही उपस्‍थित असणार आहेत. त्‍यामुळे या बैठकिला महत्‍व प्राप्त झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार एक गोष्‍ट पक्‍की झाली आहे की, युएई आणि इस्‍त्राईल यांच्यामध्ये लवकरच एकमेकांच्या देशात दूतावास सुरू करणार आहे. यामुळे राजनैतिक संबंध प्रस्‍थापित होण्यास मदत होणार आहे. व्यावसायिक संबंधांसाठी काही महत्‍वाचे करार होण्याची शक्‍यता आहे. युएईला इरानकडून धोका आहे. इस्‍त्राईल यामध्ये या धोक्‍याशी लढण्यासाठी इराणला मदत करू शकतो. तसेच सैन्य कराराचीही शक्‍यता आहे. 

आता यूएईचे व्यापारी थेट इस्‍त्राईली कंपन्यांशी व्यावसायिक संबंध प्रस्‍थापित करू शकतील. इस्‍त्रायली प्रोजेक्‍ट कोणत्‍याही बाधेविना युएईच्या बाजारामध्ये विकले जाऊ शकतील. अमेरिकेने या दोन्ही देशांमध्ये मध्यस्‍थीची भूमिका बजावली होती. ज्‍यामुळे दोन्ही देशांमध्ये २० वर्षात जवळपास ५०० इस्‍त्रायली कंपन्यांनी युएईमध्ये व्यापारी करार केले. असेही मानण्यात येत आहे की, दोन्ही देशांमधील व्यापार १५ अरब डॉलरपर्यंत पोहचणार आहे. 

Back to top button