सावधान! कोरोनासंदर्भात WHO चा नवा इशारा | पुढारी

सावधान! कोरोनासंदर्भात WHO चा नवा इशारा

जिनिव्हा : पुढारी ऑनलाईन 

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारताला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. जगभरातील अनेक देशांनी कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला. पण, यावर जागतिक आरोग्य संघटनेने आवाहन लॉकडाऊन पूर्णपणे हटवू नका असे आवाहन केले आहे. कोणत्याही देशाने कोरोना संपुष्टात आला आहे अशा पद्धतीने वागू नये असेही डब्ल्यूएचओनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम गेब्रेयेसस यांनी केले. जिइव्हामध्ये एका व्हर्च्युअल कॉन्फरन्सला त्यांनी संबोधित करताना आपले मत मांडले. 

वाचा :  युएई आणि इस्त्राईलमध्ये ऐतिहासिक करार होणार

ट्रेडोस म्हणाले, जगभरातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये, कामकरी वर्गाला आपल्या कार्यालयांमध्ये पुन्हा जाताना पाहायचे आहे. परंतु, ही महामारी पूर्णपणे संपली आहे, अशाप्रकारे कोणत्याही देशाने वागू नये. जर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कोणता देश प्रयत्न करत असेल तर त्यांना प्रथम कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवायला हवे. तसेच लोकांचे प्राणही वाचवायला हवे. कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणे म्हणजे विध्वंसाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

वाचा : सप्टेंबरमध्ये चीनविरुद्ध भारत, जपान, ऑस्ट्रेलियासह धोरण आखू : अमेरिका

Back to top button