तैवानने चिनी विमान पाडले! | पुढारी | पुढारी

तैवानने चिनी विमान पाडले! | पुढारी

ताईपे : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण चीन समुद्रावरून उद्भवलेल्या तणावादरम्यान शुक्रवारी तैवानने एक चिनी लढाऊ विमान पाडल्याचे वृत्त आहे. चीन किवा तैवान कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. 

एका परदेशी दूरदर्शन वाहिनीवरून हे वृत्त प्रसारित करण्यात आले. चिनी विमान तैवानच्या हवाई हद्दीत शिरले होते म्हणून तैवानने ते पाडले. तैवानने त्यासाठी अमेरिकन बनावटीच्या पॅट्रियट मिसाईल डिफेन्स सिस्टीमचा वापर केल्याचेही या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. तैवानने या वृत्ताचे खंडन केले आहे. यापूर्वीही चीनने अनेक वेळा तैवानच्या हद्दीत आपली लढाऊ विमाने घुसवलेली आहेत. चीनने तैवानलगत 40 हजार सैनिक तैनात केले आहेत. दोन मरिन ब्रिगेड खास बनविल्या आहेत. राजकीय पद्धतीने तैवान जर चीनचा एक घटक बनण्यास तयार नसेल तर लष्करी बळावर चीन तैवान आपल्या ताब्यात घेईल, असा उघड इशारा चीनने तैवानला दिला आहे.

तैवाननेही अमेरिकेतील लॉकडोड कंपनीसोबत लढाऊ विमाने खरेदीचा करार केला आहे. यामुळेही चीन खवळला आहे. तैवान पहिल्या टप्प्यात 90 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. 

 

Back to top button