घुसखोरीत तोंडावर आपटलेल्या चीनकडून सीमेवर युद्धसराव सुरू | पुढारी

घुसखोरीत तोंडावर आपटलेल्या चीनकडून सीमेवर युद्धसराव सुरू

बीजिंग : वृत्तसंस्था

भारतीय जवानांनी गेल्या आठवड्यात चीनच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. पँगाँग सरोवर परिसरातील उंचावरील मोक्याची ठिकाणेही ताब्यात घेतली. ड्रॅगनच्या ठेंगण्या सैनिकांना डोंगररांगामधील ही कसरत आता भारी पडलेली आहे.  तोंडावर आपटलेल्या चीनने भारताला डिवचण्यासाठी आता सीमेवर युद्धसराव केला आहे. 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक या युद्धसरावात सहभागी आहेत. विशेष म्हणजे चीनने या सरावाचा व्हिडीओ जारी केला आहे.

सरकारी चिनी वृत्तवाहिनी ‘सीजीटीएन’ने दाखविलेल्या या व्हिडीओमध्ये चिनी सैनिक लाईव्ह फायर ड्रील करत असल्याचे दिसते आहे. हे सैनिक 100 गाड्यांमधून येथे पोहोचले आहेत. त्यांनी चीनच्या रेल्वेनेे 2000 कि.मी.चा प्रवास केला आहे. सरावात तोफा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रेही वापरली जाणार आहेत. ‘सीजीटीएन’चा वृत्तनिर्माता शेन शी वेई याने स्वत:च्या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करून ‘वाट बघा’, असे उद्दाम विधान भारतीयांना उद्देशून केले आहे. फिंगर आणि डारला भागात चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी हा युद्धसराव करत आहे. भारतील सैन्याचे सीडीएस बिपीन रावत यांनीही चीनविरुद्ध प्रसंगी लष्करी बळ वापरण्याचा इशारा दिला आहे.

Back to top button