संयुक्त राष्ट्रात भारताची चीनवर मात; ECOSOC सदस्यत्व मिळवलं! | पुढारी

संयुक्त राष्ट्रात भारताची चीनवर मात; ECOSOC सदस्यत्व मिळवलं!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

संयुक्त राष्ट्रात भारताने चीनवर मात केली आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) युनायटेड नेशन्स कमिशन ऑन स्टेटट ऑफ वुमन या संस्थेच्या सदस्यपदी भारताची निवड झाली आहे. याबाबतची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी दिली आहे.

वाचा : कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचण्यास पाच वर्षे

”भारताने ECOSOC च्या संस्थेतील जागा जिंकली आहे. यामुळे भारताची कमिशन ऑन स्टेटट ऑफ वुमन संस्थेत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आमची कटिबद्धता असल्याचे समर्थन देतं. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सदस्य राष्ट्रांचे धन्यवाद!”, असे तिरुमूर्ती यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.  

वाचा : डेंग्यूप्रमाणेच कोरोनातही प्लेटलेटस् होतात कमी

कमिशन ऑन स्टेटट ऑफ वुमन संस्थेची निवडणूक भारतासह अफगाणिस्तान आणि चीनने लढविली. भारत आणि अपगाणिस्तानने ५४ सदस्य संख्या असलेल्या या संस्थेतील मते मिळवत निवडणूक जिंकली. मात्र, चीनला या निवडणुकीत दणका बसला. 

वाचा : ८०% मुंबईला  पुन्हा कोरोनाने घेरले!

भारताने ही निवडणूक जिंकल्याने कमिशन ऑन स्टेटट ऑफ वुमन संस्थेत भारत २०२१ ते २०२५ दरम्यान सदस्य राहणार आहे. 

Back to top button