अमेरिकेची कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात  | पुढारी

अमेरिकेची कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात 

वाशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

जॉन्सन ॲन्ड जॉन्सन या अमेरिकन कंपनीने कोविड १९ ची लस बनवण्यात आणखी एक यश संपादन केले आहे. लस क्लिनीकल चाचणीत अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. असा दावा कंपनीने केला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनावरील लस शोधण्यात अनेक देश प्रयत्न करत आहेत. अनेक देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. 

जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीने जाहीर केले आहे की त्यांची स्वयंसेवकांना देण्यात आलेली लस क्लिनिकल चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचणारा अमेरिकेचा हा चौथा स्वयंसेवक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर अमेरिकन नागरिकांना लस चाचणीच्या नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संबंधी माहिती दिली. 

वाचा :UN : काश्मीर मुद्द्यावरून तुर्कीची पुन्हा लुडबुड

आम्ही अमेरिकेच्या इतिहासात आर्थिक सुधारणा वेगाने केली आहे. आमचा दृष्टीकोन विज्ञानास पाठिंबा देणारा आहे. बिडेनचा दृष्टीकोन विज्ञान विरोधी आहे. बिडेनने चीन आणि युरोपच्या प्रवासावर निर्बंध आणि रणनितींचा विरोध केला आहे. त्यांच्याजवळ कधीही न संपणारा लॉकडाऊन आहे. आमची योजना व्हायरस नष्ट करेल, बिडेनची योजना अमेरिकेला चिरडेल, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

वाचा : चीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न!

Back to top button