UN : काश्मीर मुद्द्यावरून तुर्कीची पुन्हा लुडबुड | पुढारी

UN : काश्मीर मुद्द्यावरून तुर्कीची पुन्हा लुडबुड

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन 

तुर्कीचे अध्यक्ष रेचेप तैय्यप आर्दोआन यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला आहे. तुर्कीच्या या भूमिकेवर भारताने आक्षेप घेतला आहे, तर पाकिस्तानने कौतुक केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीरी जनतेच्या हक्कांच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा आवाज उठविण्यात आला आहे. यावेळी तुर्कीचे अध्यक्ष आर्दोआन यांनी पुन्हा एकदा पुधाकार घेऊन काश्मीच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. तुर्कीच्या पाठिंब्याने काश्मिरी जनतेला संघर्ष करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एक दिवस आधीच संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना अर्दोआन म्हणाले, काश्मीर संघर्ष दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा अजूनही एक ज्वलंत मुद्दा आहे. जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विषेश दर्जा संपुष्टात आल्याने तेथील परिस्थिती अधिक जटिल बनली आहे.

आर्दोआन यांच्या या भूमिकेवर भारताने कडाडून टीका करत आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी म्हटले आहे की, भारताचा अविभाज्य भाग असणा-या जम्मू आणि काश्मीरवरील तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्या टीप्पणीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांची काश्मीरविषयीची भूमिका ही भारताच्या अंतर्गत कामकाजातील हस्तक्षेप आहे. त्यांची ही भूमिका पूर्णपणे अस्वीकार्य आहे. तुर्कीने दुसर्‍या देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर करायला शिकले पाहिजे, अशा कडक भाषेत सुनावले आहे. 

सौदी अरेबियाकडून कोरोनामुळे भारतीयांना ‘नो एन्ट्री’!

भारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत

जपानमध्ये आता लग्‍नाळूंना ४.२५ लाखाचं अनुदान!

नेपाळमधील जमीनही ‘ड्रॅगन’ने घातली घशात

Back to top button