डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवले विषाचे पाकिट! | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवले विषाचे पाकिट!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हाईट हाऊससमोर पोलिसांना विषाचे पाकिट सापडले आहे. दरम्यान, हे पाकिट राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर पाठवले गेल्याचे समजते. या पाकिटात रिसीन नावाचे विष असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेतील एका वृत्तसंस्थेने पोलिसांच्या सुत्रानुसार ही बाब समोर आणली आहे. व्हाईट हाऊसमध्ये पाठवलेली प्रत्येक वस्तुची तपासणी केली जाते. तपासणीत कसलीही शंका नसेल तर ती व्हाईट हाऊसमध्ये पाठवली जाते.

अधिक वाचा : दक्षिण चीन समुद्र भारतीय नौदलाच्या टप्प्यात

अमेरिका पोलिसांच्या माहितीनूसार, हे पाकिट कॅनडामधून पाठवण्यात आले असल्याचे समजते. याबाबत अधिक तपास सुरू आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि गुप्तचर यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत. याचबरोबर यूएस पोस्टल या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.

अधिक वाचा : लडाखमध्ये थंडीने बेजार चिनी सैनिक स्ट्रेचरने तळावर!

रिसीन हे अत्यंत प्राणघातक घटक आहे एरडांच्या बियांपासुन काढले जाते. याचा वापर दहशतवादी हल्ल्यांमध्ये करण्यात आला आहे. याचा उपयोग पावडर, धुके, गोळी किंवा अॅसीड म्हणून केला जाऊ शकतो. रिसीन खाल्ल्यावर उलट्या होणे, पोटात आणि आतड्यांमधून रक्त येणे, यकृत, आणि मूत्रपिंड निकामी होणे. यानंतर पूर्ण शरिराचे रक्ताभिसरण थांबल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.

Back to top button