'तेव्हा पाकिस्तानी भारत हल्ला करेल भितीने लष्करप्रमुखांचे पाय लटपटले होते'! | पुढारी

'तेव्हा पाकिस्तानी भारत हल्ला करेल भितीने लष्करप्रमुखांचे पाय लटपटले होते'!

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मागीलवर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्‍तानने प्रचंड दबवानंतर सोडून दिले होते. दरम्‍यान या प्रकरणावरून आता पाकिस्‍तानमध्ये आता राजकारण सुर झाले आहे. पाकिस्‍तानचे खासदार अयाज सादिक यांनी दावा केला आहे की, त्‍यावेळी परराष्‍ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दावा केला होता की, पाकिस्‍तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले नाही तर, भारत पाकिस्‍तानवर हल्‍ला करेल.  

अधिक वाचा : आरोग्य सेतू ॲपची निर्मिती कोणी केली? हेच मोदी सरकारला माहीत नाही!

अयाज यांनी संसदेत बोलताना सांगितले की, कुलभूषण यांच्यासाठी आम्‍ही कोणत्‍याही प्रकारचा अध्यादेश आणला नव्हता. या सरकारने अध्यादेश लपवून ठेवला होता. आम्‍हाला इस्‍लामाबाद उच्च न्यायालयामध्ये इतके अधिकार नव्हते जितके ते सरकारला होते. अभिनंदन यांना भारताच्या हवाली करायचे की नाही यावरून जी बैठक सुरू होती. त्‍या बैठकीकडे इम्रान खान यांनी पाठ फिरवली होती. त्‍यावेळी परराष्‍ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना त्‍यावेळी घाम फुटला होता, तर लष्करप्रमुख बाजवा यांचे पाय लटपटले होते असा आरोप अयाज यांनी केला. तसेच त्‍यावेळी कुरेशी यांनी अभिनंदन यांना भारताच्या हवाली करून टाका अन्यथा रात्री ९ वाजेपर्यंत भारत पाकिस्‍तानवर हल्‍ला करेल, अशी भिती व्यक्‍त केली होती. 

अधिक वाचा : सेनेची एकहाती सत्ता आणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘भारताने हल्‍ला केला नसता’

अयाज यांनी पुढे बोलताना भारत पाकिस्‍तानवर हल्‍ला करणार नव्हता. सरकारला फक्‍त गुडघे टेकून अभिनंदन यांना भारताकडे सोपवायचे होते ते त्‍यांनी केले. गेल्‍या वर्षी बालाकोटमध्ये दहशतवादी कँम्‍पवर भारताने सर्जिकल स्‍ट्राईक केला होता. ज्‍यानंतर पाकिस्‍तानने लढाऊ विमाने भारतावर हल्‍ला करण्यासाठी भारतीय हद्दीत घुसवली होती. त्‍याला प्रत्‍युत्‍तरादाखल भारताकडून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ व्दारे कारवाईत भाग घेतला होता. 

अधिक वाचा : सर्वांसाठी लोकल; राज्य सरकारचे रेल्वे बोर्डाला पत्र 

अभिनंदन यांनी धैर्याने तोंड दिले…

पाकिस्‍तानी लढाऊ विमानांना भारतीय हवाई हद्दीतून बाहेर हुसकावताना भारतीय इवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान क्रॅश होउन ते पाकिस्‍तानच्या हद्दीत जाउन कोसळले होते. यानंतर अभिनंदन यांना पाकिस्‍तानी सैन्याने ताब्‍यात घेतले होते. त्‍यांना चौकशी दरम्‍यान पाकिस्‍तानी आर्मीने चहा पिण्यासाठी दिला होता. याचा व्हिडिओही पाकिस्‍तानकडून शेअर करण्यात आला होता.

अधिक वाचा : कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन

ज्‍याव्दारे आम्‍ही भारतीय कमांडरची योग्‍य काळजी घेत असल्‍याचे जगाला दाखवण्याचा प्रयत्‍न पाकिस्‍ताने केला होता. मात्र पाकिस्‍तानी सैनिक आणि आयएसआय यांच्याकडून अभिनंदन यांच्याशी माइंड गेम खेळण्याचा प्रयत्‍न केला होता. मात्र या दरम्‍यान अभिनंदन यांनी शस्‍त्रुंच्या या खळीवेळी न डगमगता या सर्व परिस्‍थितीला धैर्याने तोंड दिले होते. अभिनंदन यांनी भारतीय सैन्याची कोणतीही गुप्त माहिती दिली नाही. या सर्व घडामोडीनंतर अभिनंदन यांना १ मार्च रोजी अटारी-वाघा सीमेवरून भारताच्या स्‍वाधीन करण्यात आले होते. 

Back to top button