पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारनं घडवला; पाकिस्तानच्या मंत्र्यांची कबुली | पुढारी

पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारनं घडवला; पाकिस्तानच्या मंत्र्यांची कबुली

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

पुलवामा हल्ला प्रकरणी पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना पुलवामा हल्ला हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारचे यश असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने भारताला घुसून मारले आणि पुलवामा हल्ला हा पाकिस्तानचे यश असल्याचे सांगत त्यांनी सरकारची पोलखोल केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

वाचा : ‘तेव्हा पाकिस्तानी भारत हल्ला करेल भितीने लष्करप्रमुखांचे पाय लटपटले होते’!

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. आता या हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या मंत्र्यांने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

वाचा : काश्मिरात सार्वमताच्या अटीसह पाकचा भारताला शांततेचा प्रस्ताव

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्‍तानने प्रचंड दबवानंतर सोडून दिले होते. यावर पाकिस्‍तानचे खासदार अयाज सादिक यांनी दावा केला आहे की, त्‍यावेळी परराष्‍ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दावा केला होता की, पाकिस्‍तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले नाही तर, भारत पाकिस्‍तानवर हल्‍ला करेल.

मात्र, पाकिस्तान संसदेतील विरोधी पक्षाचे खासदार अयाज सादिक यांचा हा दावा मंत्री चौधरी यांनी खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी संसदेत बोलताना, पाकिस्तानने भारताला घुसून मारले. पुलवामा हल्ला सरकारचं यश आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखालील संपूर्ण पाकिस्तानचे हे यश असल्याची कबुली त्यांनी दिली.    

वाचा : ‘काँग्रेसच्या शहजाद्यांचा भारतावर विश्वास नाही, त्यांनी आता पाकिस्तानचं ऐकावं’ 

  

Back to top button