‘लाखो फ्रान्स नागरिकांना मारण्याचा मुस्लिमांना पूर्ण हक्क’ | पुढारी

'लाखो फ्रान्स नागरिकांना मारण्याचा मुस्लिमांना पूर्ण हक्क'

क्‍वालालंपूर : पुढारी ऑनलाईन

फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यावरून एकीकडे सर्व जग फ्रान्सविषयी संवेदना व्यक्त करत करत सोबत असल्‍याचे चित्र दिसत असताना, मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्‍मद यांनी एक वादग्रस्‍त आणि भडकाऊ विधान केले आहे. महातीर यांनी फ्रान्समधील हल्‍ल्‍याचे समर्थन तर केलेचं, शिवाय लाखो फ्रान्सवासियांना मारण्याचा मुस्‍लिमांना पूर्ण हक्‍क असल्‍याचे वादग्रस्‍त विधान त्‍यांनी केले आहे.  

अधिक वाचा : काश्मिरात सहा महिन्यात तब्बल १४ भाजप नेत्यांची हत्या

महातिर यांनी काल (गुरूवार) नीस येथील दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर एक ब्‍लॉग पोस्‍ट केला. ज्‍यामध्ये त्‍यांनी फ्रान्सविरूध्द विषारी लिखाण केले. ‘दुसऱ्यांचा सन्मान करा’ या शिर्षकाखाली लिहिलेल्‍या या ब्‍लॉगमध्ये महातिर यांनी नीस हल्‍ल्‍याचा उल्‍लेख केला नाही.  

अधिक वाचा : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी देशात अध्यादेश लागू

महातिर यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक या पध्दतीने एकुण १४ ट्वीट केले. यामध्ये त्‍यांनी मुस्‍लिमांसोबत भेदभावाचा उल्‍लेख केला. यामध्ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, फ्रान्सने इतिहासात मुस्‍लिमांवर जे अत्‍याचार केले. यासाठी मुस्‍लिमांना लाखो फ्रान्स नागरिकांना जीवे मारण्याचा अधिकार आहे.

अधिक वाचा : कंगनाला फैलावर घेणाऱ्या उर्मिला मातोंडकरना शिवसेनेकडून आमदारकीची बक्षिसी?

त्‍यांनी यामध्ये चेचेन्य विद्यार्थ्याकडून फ्रान्स शिक्षक सॅम्‍युअल यांच्या हत्‍येविषयी लिहिले आहे. मुस्‍लिमांना आक्रोशित होण्याचा अधिकार आहे. त्‍यांना पूर्वेत केलेल्‍या नरसंहारासाठी लाखो फ्रान्स नागरिकांना मारण्याचा पूर्ण हक्‍क आहे. फ्रान्सच्या नागरिकांनी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करायला शिकायला हवे असे त्‍यांनी म्‍हटले आहे. 

अधिक वाचा : अक्षयच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलले!

फ्रान्सच्या नीस शहरात नॉट्रडम चर्चमध्ये एका हल्‍लेखोराने एका महिलेचा चाकूने गळा कापला. या घटनेमध्ये अन्य दोन लोक जखमी झाले. आतापर्यंतच्या तपासामध्ये समोर आलेल्‍या माहितीनुसार हा हल्‍लेखोर २० वर्षीय तरूण असून, तो इटलीच्या रस्‍त्‍याने फ्रान्समध्ये दाखल झाला होता. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार हल्‍लेखोर हा हातामध्ये कुराण आणि चाकू घेवून चर्चमध्ये घुसला होता.  

Back to top button