शक्तीशाली पाकिस्तानी लष्कर आणि नवाज शरीफ यांच्यातील संघर्ष आणखी पेटला! | पुढारी

शक्तीशाली पाकिस्तानी लष्कर आणि नवाज शरीफ यांच्यातील संघर्ष आणखी पेटला!

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन

भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याच्या परिस्‍थितीवरून नवाझ शरीफ यांच्या जवळच्या अयाज सादिक यांनी एक स्‍फोटक खुलासा केला. यामुळे पाकिस्‍तानमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. पाकिस्‍तानी सैन्याचे प्रवक्‍ते मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी पीएमएल एन नेत्‍याच्या विधानाला इतिहासाला विकृत करण्याचा प्रयत्‍न असल्‍याचे म्‍हटले आहे. तर या सर्व खुलाशाला नवाझ शरीफ विरूध्द सैन्य प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यातील संघर्षाशी जोडून पाहिले जात आहे. 

अधिक वाचा : कंगनाला फैलावर घेणाऱ्या उर्मिला मातोंडकरना शिवसेनेकडून आमदारकीची बक्षिसी?

सरदार सादिक यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पाकिस्‍तानी सैन्याचे प्रवक्‍ता मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी त्‍यांचे विधान हे इतिहासाला विकृत करण्याचा प्रयत्‍न असल्‍याचे म्‍हटले. पाकिस्‍तान इतिहासाला योग्‍य करण्याच्या उद्देशाने हे स्‍पष्‍ट करतो की, पाकिस्‍तानने आपल्‍या क्षमता आणि संकल्‍पाचे प्रदर्शन केले आणि २७ फेब्रुवारीला आपल्‍या क्षमतेनुसार कारवाई केली. 

अधिक वाचा : अक्षयच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलले!

सादिक यांच्या विधानामुळे राष्‍ट्रीय सुरक्षेवर परिणाम झाला : इफ्तिखार 

इफ्तिखार यांनी म्‍हटले की, सादिक यांच्या विधानामुळे राष्‍ट्रीय सुरक्षेवर परिणाम झाला आहे. आपल्‍या सर्वांना अशा प्रसंगी जबाबदारीने काम करायला हवे, जेव्हा पाकिस्‍तानच्या शत्रूंनी देशावर हायब्रीड युध्द लादले आहे. पाकिस्‍तानच्या सशस्‍त्र सैन्याला केवळ आंतरिक आणि बाहेरील आव्हाना विषयी माहिती आहे. दरम्‍यान त्‍यांचा सामना करण्यासाठीही तयार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटल आहे. पाकिस्‍तानच्या परराष्‍ट्र मंत्र्यानीही दावा केला आहे की, भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेवाठी पाकिस्‍तानवर कोणताही दबाव नव्हता. 

अधिक वाचा : पुलवामा हल्ल्याचा गुन्हा पाककडून अखेर कबूल!

सादिक यांच्या या विधानावर परराष्‍ट्र कार्यालयाचे प्रवक्‍ता जाहिद हफीज चौधरी यांनी म्‍हटले आहे की, विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी पाकिस्‍तानवर कोणताही दबाव नव्हता. आपल्‍या साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना त्‍यांनी पाकिस्‍तानने शांततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून, आंतरराष्‍ट्रीय समुदायाने या निर्णयाचे स्‍वागत केल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले. दुसरीकडे इमरान खान यांच्या पीटीआय पक्षाने यावर नवाझ शरीफ यांचे जवळचे नेता सादिक हे भारताला खूश करण्यासाठी भारताची भाषा बोलत असल्‍याची टीका केली आहे. 

अधिक वाचा : सौदीचा डबल गेम! भारताच्या नकाशातून  जम्मू-काश्मीर गायब

सादिक यांच्या खुलाशामुळे नवाज शरीफ आणि बाजवा यांच्यातील संघर्ष तीव्र…

पीएमएल एन नेता सादिक यांच्या खुलाशाने पाकिस्‍तानमध्ये नवाझ शरीफ विरूध्द सैन्य प्रमुख यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. विश्लेषकांच्या मते सैन्य प्रमुखांवर गेल्‍या काही दिवसांपासून नवाझ शरीफ यांच्या जवळच्या सादिक यांनी टीका केली आहे. सादिक यांनी अभिनंदन यांच्या सुटकेवरून पोलखोल करून बाजवा यांच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला आहे. या आधी बाजवा अभिनंदन यांच्या अटकेवरून फुशारक्‍या मारत होते. मात्र या खुलाशामुळे त्‍यांची पोलखोल झाली आहे. इतकच नाही तर यामुळे जनरल बाजवा यांच्या हातातले बाहुले बनलेले इमरान सरकारही आता टीकेचे लक्ष्य बनले आहे. 

Back to top button