व्हिएन्नात हल्ला करणारा ‘तो’ दहशतवादी ‘इसिस’ समर्थक | पुढारी

व्हिएन्नात हल्ला करणारा ‘तो’ दहशतवादी ‘इसिस’ समर्थक

व्हिएन्ना : पुढारी ऑनलाईन

ऑस्‍ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्‍ला झाला आहे. दरम्यान, व्हिएन्नामध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्‍यू झाला असून १५ लोक जखमी झाले आहेत. ऑस्‍ट्रियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेला दहशतवादी हल्‍ला म्‍हटले आहे. या हल्ल्यात एक दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. यावर ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहआमर यांनी प्रतिक्रिया देत हा दहशतवादी इस्लामिक स्टेटचा या संघटनेचा होता, अशी माहिती दिली आहे.

अधिक वाचा : खलिस्तानवादी संघटनेची १२ संकेतस्थळे ब्लॉक

दरम्यान, नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मारला गेलेल्या दहशवाद्यासोबत इतर साथीदार होते का? याचा तपास केला जात आहे, अशीही माहिती नेहआमर यांनी दिली. मारण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव, पत्ता सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

अधिक वाचा : ऑस्‍ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्‍ला, २ ठार 

नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. मारला गेलेल्या दहशवाद्यासोबत इतर त्याचे साथीदार होते का ? याचा तपास केला जात असल्याची माहिती नेहआमर यांनी दिली. मारण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव, पत्ता सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

अधिक वाचा : व्हिएन्ना दहशवादी हल्ला : भारतातील ऑस्ट्रियाचे ​दूतावास ११ नोव्हेंबरपर्यंत बंद

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर हादरलेल्या ऑस्ट्रियाने नवी दिल्लीतील दूतावास सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले आहे. दूतावास ११ नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ऑस्ट्रियाकडून मंगळवारी (दि. ३) घेण्यात आला. सोमवारी व्हिएन्नात दहशवादी हल्ला झाल्याचे ऑस्ट्रियाकडून सांगण्यात आले होते. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यानिमित्ताने दूतावासाकडून करण्यात आले आहे.

Back to top button