अमेरिकेत अब की बार ज्यो बायडेन की सरकार? बहुमतासाठी फक्त सहा मतांची गरज!  | पुढारी

अमेरिकेत अब की बार ज्यो बायडेन की सरकार? बहुमतासाठी फक्त सहा मतांची गरज! 

वॉशिंग्टन  : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेत इतिहास घडणार हे जवळपास निश्चित होत चालले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे  उमेदवार ज्यो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सत्ता खेचण्याच्या समीप आहेत. त्यांना इलेक्टोरल व्होटससाठी अवघ्या ६ मतांची आवश्यकता आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल पुढील काही तासांत अपेक्षित आहे. एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहिलेल्या मतमोजणीनंतर आता चित्र स्पष्ट दिसत आहे. विस्कॉन्सिन, मिशिगन यासारख्या महत्त्वाच्या राज्यात डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायडेन विजयी झाले आहेत. अमेरिकन मीडियाच्या म्हणण्यानुसार, ते विजयापासून अवघ्या ६ मतांची गरज आहे. 

बायडेन यांच्याकडे २६४ इलेक्टोरल व्होटस आहेत. ट्रम्प यांच्याकडे केवळ २१४ मते आहेत. बायडेन बहुमताच्या जादुई आकड्यापासून अवघ्या सहा मतांनी दूर आहेत. परंतु, बऱ्याच महत्त्वाच्या राज्यांचे निकाल अजून येणे बाकी आहे. नेवाडा आणि पेनसिल्व्हेनियासारख्या काही राज्यांत अजूनही मतमोजणी चालू आहे आणि येथील निकाल बायडेन आणि ट्रम्प दोघांनाही निर्णायक ठरतील.

Back to top button