पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडणार? | पुढारी | पुढारी

पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडणार? | पुढारी

माॅस्को : पुढारी ऑनलाईन

गेल्या २० वर्षापासून रशियावर राज्य करणारे राष्ट्राध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन २०२१ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन यांची प्रेयसी जिमनास्ट अलीना कबाइला आणि तिच्या दोन मुलींनी पुतीन यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. गेल्या काही दिवसापासून पुतिन पार्किन्सन (Parkinson) आजाराशी झुंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी पुतिन यांचे काही फोटो समोर आले होते. यात त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे दिसले होते. द सनच्या वृत्तानुसार, पुतीन यांची तब्येत खालावली आहे. नुकत्याच एक बैठकीत त्यांच्या हातात औषध असल्याचे दिसले होते. 

मॉस्कोचे राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवे यांनी ब्रिटीश वृत्तपत्र द सनला सांगितले आहे की, रशियाचे राष्ट्रपती यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली यांनी पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. ते म्हणाले, ‘पुतीन यांचे एक कुटुंब आहे आणि त्यांचा रशियन राष्ट्रपतींवर खोल प्रभाव आहे. जानेवारीत पुतिन सर्व अधिकार दुसऱ्याला देऊन राष्ट्रपतीपद सोडू शकतात. असे विश्लेषक वलेरी सोलोवे यांनी म्हटले आहे.

पुतिन यांच्या राजीनाम्याच्या चर्चा अशा वेळी समोर आल्या आहेत जेव्हा रशियन सभासद एका विधेयक आणण्याच्या विचारात आहेत. या विधेयकामुळे त्यांची फौजदारी कारवाईतून आजीवन सुटका होईल.

Back to top button