पराभव दिसू लागताच डोनाल्ड ट्रम्प यांचा तीळपापड? मतमोजणी सुरु असतानाच घेतला मोठा निर्णय! | पुढारी

पराभव दिसू लागताच डोनाल्ड ट्रम्प यांचा तीळपापड? मतमोजणी सुरु असतानाच घेतला मोठा निर्णय!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

फक्त अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुक निकाल निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अमेरिकेत खांदेपालट होण्यावर जवळपास निश्चित होत चालले आहे. अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार ज्यो बायडेन यांना बहुमतासाठी फक्त सहा इलेक्टोरल व्होट्सची आवश्यकता आहे. फॉक्स न्यूजने ही माहिती दिली आहे.

अधिक वाचा : अमेरिकेत अब की बार ज्यो बायडेन की सरकार? बहुमतासाठी फक्त सहा मतांची गरज! 

फॉक्स न्यूजने दिलेल्या अंदाजानुसार मिशिगन राज्यात जिंकल्यानंतर बायडेन यांना निवडणूक जिंकण्यासाठी अवघ्या सहा निवडणूक मतांची आवश्यकता आहे. फॉक्स न्यूजच्या मते, ९९ टक्के बॅलेट मतांमधील बायडेन यांना ४९.९ टक्के मते बायडेन यांना, तर डोनाल्ड ट्रम्प यांना ४८.६ टक्के मते मिळाली. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी २७० इलेक्टोरल व्होट्स आवश्यक आहेत. 

अधिक वाचा : डोनाल्ड ट्रम्प- जो बायडेन यांच्यात अटीतटीचा सामना 

मतमोजणी थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिशिगन कोर्टात पोहोचले आहेत. ट्रम्प यांचे मॅनेजर बिल स्टीफन यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मिशिगनमधील मतमोजणी रोखण्यासाठी ट्रम्प यांनी कोर्टाकडे अपील केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही मतगणना व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मतांची मोजणी थांबवावी यासाठी आम्ही मिशगनच्या कोर्टात अपील केले आहे. आम्ही उघडलेल्या तसेच मोजलेल्या मतपत्रिकांचा आढावा घेण्याची मागणी केली आहे कारण आम्हाला ते योग्य दिसत नाहीत.

अधिक वाचा : जो बायडेन यांनी इतिहास रचला

अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी मिशिगन राज्यात विजय मिळवला आहे. सीएनएन न्यूज वाहिनीने ही माहिती दिली आहे. यासह, बायडेन यांना आणखी १६ मतदार मते मिळतील, असे सीएनएनने म्हटले आहे. मागील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हे राज्य जिंकले होते. 

अधिक वाचा : आता याला काय म्हणावं! ट्रम्प ज्युनिअरनं नकाशात काश्मीर दाखवला पाकिस्तानात

Back to top button