अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदा जो बायडेन करणार ‘ही’ महत्वाची घोषणा | पुढारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदा जो बायडेन करणार 'ही' महत्वाची घोषणा

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर जो बायडेन यांनी आपल्या समर्थकांना शनिवारी संबोधित केले. निवडणूक जिंकल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आपले प्राध्यान्य कशाला असेल हे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीमुळे अमेरिकेतील नागरिकांमध्ये दुरावा वाढला असल्याचे सांगत त्यांनी लोकांना संयम राखण्याचे आवाहन केले. राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी २७० इलेक्ट्रोल मतांची गरज आहे. जो बायडेन या बहुमतांच्या आकड्याजवळ पोहोचले आहेत.

वाचा : पराभवाच्या वाटेवरील डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का!

बायडेन म्हणाले की, अद्याप आमच्या विजयाची घोषणा झालेली नाही. मात्र, आकड्यातून चित्र स्पष्ट झाले आहे. आम्ही शर्यत जिंकत आहोत. राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठीच्या योजनेची घोषणा करणार आहे.

वाचा : तर व्हाईट हाऊसमधून जबरदस्तीने हद्दपार केले जाईल; ज्यो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले! 

निवडणुकीनंतर देशात तणाव वाढला आहे. आम्ही प्रतिस्पर्धी आहोत. मात्र, शत्रू नाही. अमेरिकेतील लोकांना देश एकजूट असलेला हवा आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्था, जलवायू परिवर्तन, वर्णद्वेष आदी समस्यांविरोधात लढण्यासाठी लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.

वाचा : कायद्याचे काटे; बायडेन यांचा मार्गही खडतर…

दरम्यान, बायडेन यांच्याकडे सत्ता आल्यानंतर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ते कडक प्रतिबंध लावू शकतात, असे संकेत मिळत आहेत.     

 

Back to top button