ज्यो बायडेन यांच्यामुळे भारतावर काय परिणाम होतील; एच -१ बी व्हिसामध्ये बदल होणार? | पुढारी

ज्यो बायडेन यांच्यामुळे भारतावर काय परिणाम होतील; एच -१ बी व्हिसामध्ये बदल होणार?

वॉशिंग्‍टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये ज्‍यो बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे राष्‍ट्राध्यक्ष होण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. त्‍यामुळे आता यापुढे भारतासोबत अमेरिकेचे संबंध कसे असतील यावर चर्चा सुरू झाली आहे. २१ व्या शतकात भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण, राजनैतिक आणि सुरक्षा संबंध मजबूत झाले आहेत. त्‍यामुळे अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर रिपब्‍लिकन किंवा डेमोक्रॅट यामधील कोणी असो, हे संबंध बायडेन प्रशासनामध्येही असेच राहण्याची शक्‍यता आहे. दरम्‍यान चीन बाबतीत बायडेन यांच्या कँम्‍पमध्येही दोन मतप्रवाह आहेत. त्‍यामुळे याचा परिणाम भारतावर होण्याची शक्‍यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाहुयात की, नव्या बायडेन प्रशासनाचा भारत संबंधांवर काय परिणाम होउ शकतो. 

अधिक वाचा : थेट अमेरिकेत ‘अब की बार ट्रम्प सरकार’ म्हणणारे पीएम मोदी ज्यो बायडेन निवडून येताच काय म्हणाले?

चीन बाबत काय विचार?

बायडेन यांनी आपल्‍या निवडणूक प्रचारा दरम्‍यान भारतीय अमेरिकनांशी संपर्क साधला होता. ते भारतासाठी उदारवादी विचार ठेवतात. काही वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारले आहेत. अशावेळी यामध्ये बदल करणे शक्‍य होणार नाही. टीम बायडेन मध्ये चीन बाबत दोन मतप्रवाह आहेत. याचा परिणाम भारत-चीन यांच्यातील संबंधांवरही पडू शकतो. बायडेन यांच्या काही सल्‍लागारांनी चीन बाबत ट्रम्‍प यांच्यासारखीच मते ठेवली आहेत. तर बाकींच्या मते अमेरिका आणि चीनी अर्थव्यवस्‍थेला वेगळे ठेवणे अशक्‍य आहे. 

अधिक वाचा : बायडेन यांच्यासमोर कोरोना नियंत्रणाचे आव्हान!

व्यापारी संबंध कसे असतील?

बायडेन यांच्या कॅम्‍पने इंडो-पॅसिफिक बाबत आपली रणनिती अजूनही स्‍पष्‍ट केलेली नाही. दरम्‍यान हा प्रदेश भारतीय परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्‍थानी आहे. त्‍यामुळे यावर लक्ष ठेवावेच लागेल. भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी संबंधांमध्ये अडचणी असतील. ओबामा प्रशासन काळातही नवी दिल्‍ली आणि वॉशिंग्‍टन मध्ये या क्षेत्रावरून संबंध ताणलेले असायचे. त्‍या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनातही भारताला व्यापारात काही खास सवलत मिळण्याची शक्‍यता कमीचं आहे. या व्यतिरिक्त, बायडेन यांच्याकडे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ची स्वतःचा विचार देखील आहे.

अधिक वाचा : भारतीय अमेरिकनांचे राजकारणावर वर्चस्व

एच 1-बी व्हिसाचे काय?

बायडेन प्रशासन भारतात मानवाधिकारांचे उल्‍लंघनासारख्या बाबींवर नजर ठेवू शकते. या सोबतच हिंदू बहुसंख्यकवाद, जम्‍मू आणि काश्मीर याची दखलही घेतली जाऊ शकते. डेमोक्रॅट्सने भरलेल्या काँग्रेसमध्ये अशा गोष्टींकडे भारताविरूद्ध बारकाईने नजर ठेवले जाऊ शकते. एच -1 बी व्हिसा त्याच्या जुन्या स्‍वरूपात परत येण्याची शक्यता कमी आहे. ज्‍याचा परिणाम भारतीयांवर होऊ शकतो. परंतू ज्या प्रकारे कोरोनाच्या साथीने दूरून काम करण्यास प्रोत्साहित केले आहे, त्याचा परिणाम कमी होण्याची अपेक्षा आहे.

Back to top button