लोकांना एकमेकांपासून तोडण्याचे नव्हे, तर जोडण्याचे काम करणार : ज्यो बायडेन | पुढारी

लोकांना एकमेकांपासून तोडण्याचे नव्हे, तर जोडण्याचे काम करणार : ज्यो बायडेन

विल्मिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणे निश्चित झाल्‍यावर ज्‍यो बायडेन यांनी पहिल्‍यांदाच देशवासियांना संबोधित केले. होम डेलाव्हर्स राज्यात त्यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. बायडेन यांच्यासोबत यावेळी उपराष्‍ट्राध्यक्ष म्‍हणून निवड झालेल्‍या कमला हॅरिसन या देखील उपस्‍थित होत्‍या. या दोघांनीही आपल्‍या भाषणात सर्व अमेरिकेला सोबत घेऊन वाटचाल करणार असल्‍याचे सांगितले. 

अधिक वाचा : ज्यो बायडेन यांच्यामुळे भारतावर काय परिणाम होतील; एच -१ बी व्हिसामध्ये बदल होणार?

अमेरिकेचे ४६ वे राष्‍ट्राध्यक्ष बनणाऱ्या ज्‍यो बायडेन यांनी म्‍हटले की, अमेरिकेच्या जनतेने उत्‍तर दिले आहे. त्‍यांनी स्‍वच्छ विजय दिला आहे. मी हे पाहू शकतो की, अमेरिका आणि जगभरातील लोकांमध्ये कशी आनंदाची लाट आहे. 

अधिक वाचा : ज्यो बायडेन : सर्वांत युवा सिनेटर ते वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष; लढवय्या महामेरुचा ५० वर्षांचा अथक प्रवास!

मी अमेरिकेला लाल-निळा नाही तर, संयुक्‍त अमेरिका म्‍हणूनच पाहीन…

बायडेन यांनी आपल्‍या भाषणात मी असा राष्‍ट्रपती बनेन जो लोकांमध्ये फूट पाडण्यात नाही तर, लोकांना एकत्र ठेवण्याचे काम करेल. शिवाय मी निळ राज्‍य किंवा लाल राज्‍य पाहत नाही तर मी संयुक्‍त अमेरिकेला पहात असल्‍याचं सांगितले. 

अधिक वाचा : बायडेन यांच्यासमोर कोरोना नियंत्रणाचे आव्हान!

बायडेन यांनी ट्रम्‍प समर्थकांपुढे केला मैत्रिचा हात…

आपल्‍या भाषणा दरम्‍यान बायडेन यांनी डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचा उल्‍लेख केला. ते म्‍हणाले, मी समजू शकतो की, डोनाल्‍ड ट्रम्‍प समर्थक या निकालाने निराश झाले आहेत. मी ही किती तरी वेळा निराश झालो आहे. मात्र आपल्‍याला एकमेकांना संधी द्यायला हवी. आपापसातील मतभेद कमी करून, एकत्र काम करायला हवे. आपण प्रतिस्‍पर्धी आहोत मात्र शत्रू नाही असे बायडन यांनी म्‍हटले आहे.  

अधिक वाचा : भारतीय अमेरिकनांचे राजकारणावर वर्चस्व

कमला हॅरिसन यांनी आई श्यामला गोपालन यांची आठवण काढली

उपराष्‍ट्राध्यक्षपदी निवड झालेल्‍या कमला हॅरिसन यांनी भाषणात आपल्‍या आईचे आभार मानले. कमला म्‍हणाल्‍या, मी माझी आई श्यामला गोपालन हॅरिस यांची आभारी आहे. जी माझ्या आजच्या विजयासाठी प्रेरक आहे. वयाच्या १९ व्या वर्षी मी भारतातून अमेरिकेत आले होते, तेव्हा वाटले नव्हते की हा दिवस ही येईल. मात्र अमेरिकेत तीचा विश्वास होता की हे शक्‍य आहे. 

Back to top button