डोनाल्ड ट्रम्प यांना जावयाकडून मोलाचा सल्ला! | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प यांना जावयाकडून मोलाचा सल्ला!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकन निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाकून झालेला पराभव स्वीकारण्याच्या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जावई आणि त्यांचे वरिष्ठ सल्लागार जारेड कुशनेर यांनी चर्चा केल्याचे समोर आले आहे. रविवारी अमेरिकन माध्यमांच्या वृत्तांमध्ये  याबाबत वृत्त आले आहे. सीएनएनने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. 

ट्रम्प यांनी यापूर्वी निवेदनात म्हटले होते की, बिडेन घाईघाईने स्वत:ला विजयी घोषित करत आहेत. निवडणुकीची शर्यत अद्याप संपलेली नाही. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर कुशनेर यांनी त्यांची भेट घेतली. ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या निवडणूक मोहिमेचे डेप्युटी कॅम्पेन मॅनेजर केट बेडिंगफील्ड म्हणाले की, बायडेन आणि ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झालेला नाही.

सीएनएनने दोन अज्ञात स्रोतांचा हवाला देत म्हटले आहे की कुशनेर यांनी ट्रम्प यांच्याशी पराभव स्वीकारण्याबाबत संपर्क साधला आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कुशनेर यांनी अध्यक्षांना निवडणुकीचे निकाल मान्य करण्याची विनंती केली आहे. 

फॉक्स न्यूजने दोन स्रोतांचा हवाला देत असे म्हटले आहे की, ट्रम्प यांच्याकडू गोटातून मिळालेल्या माहितीनुसार आलेले परिणाम बदलण्यात अपयशी ठरल्यास ते पराभव स्वीकारून शांततेत सत्ता हस्तांतरित करतील. ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही तरीही, २० जानेवारी २०२१ रोजी बायडेन यांना अध्यक्षपद स्वीकारण्यापासून रोखले जाणार नाही. बिडेन यांच्या मोहिमेचे वरिष्ठ सल्लागार सिमोन सँडर्स यांनी पत्रकारांना सांगितले की डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीतील विजेता ठरविण्याचा अधिकार नाही.

व्हॉईस ऑफ अमेरिकेने सँडर्सच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, लोक निर्णय घेतात, देशाचे मतदार निर्णय घेतात. मतदारांनी त्यांची निवड अगदी स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की जोपर्यंत अमेरिकन जनतेची मते प्रामाणिकपणे मोजल्याशिवाय मी हार मानणार नाही. त्यास ते पात्र आहेत आणि ही लोकशाहीची मागणी आहे. 

Back to top button