जगातील कोरोनाबाधितांची संख्या ५ कोटींवर | पुढारी

जगातील कोरोनाबाधितांची संख्या ५ कोटींवर

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

जगभरातील कोरोना रूग्‍णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी जगभरातील कोरोनाग्रस्‍तांची एकुण संख्येने ५ कोटींचा आकडा पार केला. कोरोना प्रकरणांवर लक्ष ठेवणार्‍या वर्ल्डोमीटर या वेबसाईटच्या माहितीनुसार, काल (रविवार) सायंकाळपर्यंत कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढून ५.०३ कोटींवर पोहोचले आहेत. 

अधिक वाचा : ज्यो बायडेन यांच्यामुळे पाच लाख भारतीयांना ‘लॉटरी’ लागणार?

रविवारी सायंकाळी जगभरात १२,५८,२३५ लोकांचा मृत्‍यू झाले आहेत. यामध्ये दिलासादायक गोष्‍ट म्‍हणजे जागतिक स्‍तरावर कोरोना महामारीत बरे होणाऱ्या रूग्‍णांची संख्या वाढून ३.५६ कोटी इतकी झाली आहे. तर काल (रविवार) सायंकाळ पर्यंत सक्रिय रूग्‍णांची संख्या १३,५०७,४९० होती. दरम्‍यान सध्या जगातील अमेरिका आणि युरोपीय देशात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट आल्‍याने रूग्‍णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाल्‍याचे समोर येत आहे. 

अधिक वाचा : सीमावादासंबंधी भारत-चीन दरम्यान बैठक सकारात्मक

अमेरिकेत शनिवारी २४ तासांत सलग आठव्या दिवशी १ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये शनिवारी २४,९५७ प्रकरणे समोर आली आहेत. तर ४२३ जणांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. फ्रान्समध्ये ८६,८५२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर ३०४ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. या सोबतच फ्रान्समध्ये एकुण प्रकरणे १७,४८,७०५ च्या पुढे गेली असून, एकुण मृत्‍यूंची संख्या ४०,१६९ च्या पार केला आहे. फ्रान्स मध्ये समोर आलेल्‍या अहवालात ८६,८५२ प्रकरणांसोबतच काही जुनी प्रकरणे समोर आली आहेत. ज्‍यांची आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : कॉम्प्युटर बाबाचा आश्रम तोडून कारागृहात रवानगी 

इटली मध्ये ३९,८११ नवीन बाधित आढळले आहेत. यामध्ये ४२५ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. जर्मनी मध्ये गेल्‍या २४ तासात १६,०१७ नवीन प्रकरणे समोर आली असून, बाधितांची संख्या ६,५८, ५०५ झाली आहे. तर रशीया मध्ये २०,३९६ नवीन प्रकरणांसोबतचं ३६४ मृत्‍यूची प्रकरणे समोर आली आहेत. 

Back to top button