आवडत्या खाद्यपदार्थाचे नाव ऐकताच चक्क कोमातून आला बाहेर! | पुढारी

आवडत्या खाद्यपदार्थाचे नाव ऐकताच चक्क कोमातून आला बाहेर!

तैवान (चीन) : पुढारी ऑनलाईन

आवडत्या पदार्थाचे नाव घेताच सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. पण तैवानमध्ये एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. तैवानमध्ये अठरा वर्षांच्या एका तरुणाने आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचे नाव ऐकताच चक्क कोमातून बाहेर आला आहे. या घटनेतील तरूणाचे नाव चियू असे आहे.

अधिक वाचा : कर्मचार्‍यांना तब्बल पाच पगार बोनस!

चियू जुलैमध्ये एका दोन चाकी अपघातात गंभीररीत्या जखमी झाला होता. यानंतर त्याला हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. या अपघातात चियूला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो कोमात गेला. हॉस्पिटलमध्ये चियू सलग दोन महिने (६२ दिवस) कोमात राहिला. यानंतर एक दिवस चियूचा मोठा भाऊ त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. यावेळी त्याने गमतीने चियूला म्हटले की, मी तुझ्यासाठी तुझे आवडते चिकन फिलेट खाणार आहे. हे शब्द कानावर पडताच चियूच्या शरीरात हालचाली होण्यास सुरूवात झाली. येवढेच नाही तर चक्क काही वेळाने तो पुर्णपणे शुद्धीवर आला. सध्या चियूला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

अधिक वाचा :चीनवर भडकला अमेरिका, हाँगकाँगच्या बाबतीत उचलेल्या पावलांवर घेतला आक्षेप

चियूवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले की, ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळी तो जगेल की नाही याबाबत शक्यता होती. चियूचे डावे मूत्रपिंड, यकृत आणि अन्य अवयवांना गंभीर दुखापत झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी फ्रॅक्चर होवून रक्‍तस्त्रावही होत होता. यामुळे त्याच्यावर सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. याबाबत आश्चर्य वक्त करण्यात येत आहे.

 

Back to top button